कायद्यातील अन्यायकारक तरतूद रद्द करण्यासाठी वाहन चालकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Khozmaster
2 Min Read
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
केंद्र सरकारने नुकतेच ३ नविन सुधारणा
विधेयक पारीत केली आहेत. त्यामधील विधेयकात अपघात
झाल्यानंतर वाहन चालक वाहन सोडून पळून गेल्यास ७ ते १०
लाख रूपयापर्यंत दंड व १० वर्ष शिक्षा अशी तरतूद करण्यात
आली आहे. अपघात घडल्यास दोष नसतानाही वाहन चालकांना
मार खावा लागतो किंवा जीव गमवावा लागतो अशा परिस्थितीत
बऱ्याच वेळा मोठ्या वाहनाचे चालक स्वतः चा जीव वाचविण्याकरीता
घटनास्थळावरून पळून जात असतात. नविन सुधारणा विधेयक
वाहन चालकावर अन्यायकारक असल्याने सदर विधेयकातील तरतूद
रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट
मंठा तालुक्यातील सर्व ड्रायव्हर युनियनचे अध्यक्ष सदस्य  याच्या नेतृत्वात वाहन चालकांनी देशव्यापी बेमुदत
संप पुकारला असून या अनुषंगाने आज २ जानेवारी २४ रोजी
दुपारी १२ वाजताच्या सुमारास स्थानिक वाहन चालकांनी छत्रपती संभाजी महाराज चौकामधुन
तहसीलद कार्यालय मंठा येथे भव्य मोर्चा काढण्यात होता. सदर मोर्चा तहसील
कार्यालयावर धडकल्यानंतर नायब तहसीलदार यांना तहसीलदार
यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वरील अन्यायकारक
तरतूद रद्द करण्याबाबत शासनाने ३ जानेवारी २४ पर्यंत ठोस
निर्णय घ्यावा, अन्यथा ४ जानेवारी २४ पासून लोकशाही मर्गाने
आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
या वेळी संजय काळे, नारायण खराबे,ईमराण खान, चंदु बोराडे,मोईन कुरेशी,अलीम कुरेशी, सिंकदर भाई,विजय पाजणे,शाम ऊबाळे, दिनकर चव्हाळ, रब्बानी शेख, अनिल हिरे,रवी मानोलकर,आपसर पठाण, दत्ता आवचार, साजिद शेख, संतोष आवचार, पप्पु बोराडे, हुसेन शेख सलीम बेग व मंठा तालुक्यातील लहान मोठ्या गाड्याचे सर्व ड्रायव्हर बांधवांची मोठी उपस्थिती होती
0 9 4 6 5 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *