शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई.. ३ गावठी पिस्तूल व १० जिवंत राउंड सह वाहन जप्त.

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी :फैजल पठाण.शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना त्यांच्या विश्वासनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की मध्य प्रदेश येथून निखिल एकनाथ चोरे राहणार डोंगरगण ता. शिरूर हा शिरुर एसटी स्टँड वर येणार असून त्याच्याकडे एक गावठी बनावटीची पिस्तूल व ४ राउंड आहेत ही माहिती कळतच पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सापळा रचून पंचासह आरोपीस ताब्यात घेतले.

  त्याच्या जवळील बॅगे मध्ये २५,४००रु किमतीची शस्त्र सापडली. आरोपी विरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गु .र.नं. १४१९/२०२३ भा.ह.का.क.३,२५(१A) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
  चौकशी दरम्यान आरोपी यांने सदर पिस्तूल मध्ये प्रदेशातून आणल्याचे सांगितले, तसेच  त्याचे सोबत विकास बाबाजी चोरे व शुभम सुरेश चोरे यांनी त्यांच्याकडील एन्डेवर गाडी एम एच १२. एस एच ३३४४ यामध्ये दोन पिस्तूल व जिवंत सहा राउंड आणल्याचे सांगितले व त्यांनाही ताब्यात घेऊन त्यांची ही चौकशी केली असता त्यांच्याकडून ५०,८०० रु किमतीचे शस्त्र व गुन्हा करण्यासाठी वीस लाख रुपये किमतीची गाडीही जप्त करण्यात आली.
  सदर आरोपी हे २० ते २५ वयोगटातील असून सध्या त्यांना अटक करण्यात आलेली  आहे
  सदरची कारवाई पोलीस निरीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग श्री यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस स्टेशन संजय जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार स.पो.नि. संदीप यादव ,अमोल पन्हाळकर, पो.स.ई सुनील उगले, एकनाथ पाटील, सहा. फौज. गणेश देशमाने ,ह.वा परशराम सांगळे, पो .ना. नाथ साहेब जगताप,पो .अं. रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई, अर्जुन भालसिंग, दीपक पवार यांनी ही कारवाई केली व सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसइ एकनाथ पाटील करीत असून  आरोपींना न्यायालयाने ४/१/२४ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे
0 9 3 8 1 1
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *