पालकमंत्री यांनी दिलेल्या आश्वसनाचा त्यांनाच विसर

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी अकोला – येथे ७ व मोठया थाटामाटात महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. तेंव्हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सर्वच अद्यावत आरोग्य सेवा उपलब्ध असतील व ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी पालकमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सांगताना कोट्यवधी रुपयांची यंत्र सामुग्री ऊपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याने रुग्णांना सेवा देण्यासाठी हॉस्पिटल प्रशासन कमकुवत ठरत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळें आरोग्य शिबिरात माजी पालकमंत्री व विद्य.पालकमंत्री यांनी दिलेल्या आश्वसनाचा विसर त्यांनाच पडला असल्याने उमेश इंगळे यांनी पालकमंत्री ना विखे यांनी घेतलेल्या जनता दरबारात स्मरणपत्र निवेदन दिले आहे.

रुग्णांवर तात्काळ उपचारासाठी अपघात कक्ष कार्यान्वित आहे.याच अपघात कक्षात प्रिया गुजराल ही महिला रुग्ण खामगाव जिल्हा बुलडाणा येथून कुत्रा चावल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात इंजेक्शन घ्यायला आली होती. परंतु अपघात कक्षात ते इंजेक्शन उपलब्ध नव्हते. वैद्यकीय अधिकारी यांनी त्या महिलेला इंजेक्शन उपलब्ध नसल्याने वापस पाठवण्यात आले. तसे वैद्यकीय अधिकारी यांनी लेखी दिले.तसेच काही दिवसांपूर्वी राधा नागसेन इंगळे या महिलेला एम. आर. आय करिता सर्वोपचार रुग्णालयातुन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आले होते. त्यांना ही तिथं एम आर आय तपासणीसाठी आवश्यक असलेले इंजेक्शन बाहेरून आणावे लागले. त्यामुळें आरोग्य शिबिरात ना.देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वसनाची तात्काळ पूर्तता करावी याची आठवण अकोला जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री यांना स्मरण करून स्मरणपत्र दिले. यावेळी पालकमंत्री यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सर्वच यंत्रणा ऊपलब्ध असल्याचे सांगत वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला आहे. तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रिक्त जागेवर पदभरती करण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडु असे कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी पालकमंत्री यांना दिलेल्या स्मरणपत्रनिवेदनात नमुद केले आहे.
0 9 4 6 5 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *