छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर.
“देशाच्या ग्रामीण भागातील महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर”महिलांच्या सबलीकरणानेच देश सबल होईल यास्तव महिलांना विविध उद्योगासाठी भाग भांडवल उपलब्ध करुन देणे,व त्यांच्या आत्मनिर्भर साठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व निर्मला इन्स्टिट्यूट या सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार धोंडीरामसिंह राजपूत यांनी ग्रामीण भागातील महिलांना ६२५कोंबडीची पिल्ले वाटप प्रसंगी मंगळवार(ता,०२)रोजी केले,सामाजिक संस्था निर्मला इन्स्टिट्यूटच्या वतीने तालुक्यातील बोरसर,बेलगाव,भायगाव, बिलोणी, रोटेगाव येथील महिला बचत गट याना ६२५कोंबडी पिल्ले वाटण्यात आली,संस्थेच्या प्रमुख नॅन्सी रोद्रीग्ज,मार्गारेट,व छाया बंगाळ यांची या प्रसंगी उपस्थिती होती,महिला आत्मनिर्भरतेसाठी बंगलोर च्या किरण गार्डनर यांनी आर्थिक हातभार लावला,निर्मला इन्स्टिट्यूट मार्फत मागच्या वर्षी ही कोंबडीची पिल्ले वाटप करण्यात आली ते कुटुंब आत्मनिर्भर झाले,