राधानगरी विधानसभा मतदार संघातील 150 शेतकऱ्यांना राज्याबाहेर शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला असून या दौऱ्याचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित गाडी पुजन करून करण्यात आला.
शेतकऱ्यांना राज्याबाहेर सुरु असणारे कृषी विषयक नव-नविन तंत्रज्ञान, संशोधन याबाबतची माहिती मिळावी व शेतकरी यांनी आपल्या शेतात या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, शेतकरी सक्षम बनावेत आणि तंत्रज्ञान प्रसारामध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. या अभ्यास दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना ऊस शेती, फळबाग लागवड, सेंद्रीय शेती, रेशीम उद्योग याबद्दल नवीन संशोधनाची शास्रशुद्ध माहिती मिळणार आहे.
या अभ्यास दौऱ्यामध्ये ऊस संशोधन केंद्र कोईमतूर (कर्नाटक), काजू अनुसंधान निदेशालय पत्तूर (कर्नाटक), सेंद्रीय शेती संशोधन केंद्र, म्हैसूर (कर्नाटक), भारतीय फळ पिके संशोधन केंद्र, बेंगलोर (कर्नाटक), चहाचे मळे व कारखाना, ऊटी (तमिळनाडू) या ठिकाणी भेट देण्यात येणार आहे.
यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, राहूरी कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले, राज्य आत्मा समितीचे सदस्य अशोकराव फराकटे, बाजार समितीचे माजी संचालक कल्याणराव निकम, मौनी विद्यापीठाचे शासन नियुक्त प्रतिनिधी बाजीराव चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य जयवंतराव चोरगे, तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, गारगोटी उपसरपंच सागर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भोई, भरत शेटके, दिपक देसाई, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश सुतार, रणधिर शिंदे, राजेंद्र चिले, अजित चौगले, सचिन पिसे, जितेंद्र भोसले, यांच्यासह प्रमुख मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.