आझाद हिंदचे सावित्रीमाईंना अभिवादन.सावित्रीमाई मुळेच महिला आत्मनिर्भर झाल्या. सुभाष भागीले.

Khozmaster
1 Min Read
बुलढाणा. सावित्रीबाईंच्या त्याग,परिश्रमामुळे महिलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार मिळाला. त्यामुळेच महिला आत्मनिर्भर झाल्या असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष भागिले यांनी व्यक्त केले.
स्थानिक आझाद हिंदच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन एक जानेवारीला सायंकाळी संपर्क कार्यालया करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष भागिले यांनी उपरोक्त भावना व्यक्त केल्या.
प्रबोधनकार अँड.सतीशचंद्र रोठे, सामाजिक कार्यकर्ते मुकेश तायडे, राजू सरकटे, अतुल सोनोने,सुरेखाताई निकाळजे, पंचफुला गवई,अलका खांडवे, ज्योत्स्ना नागरे, आशाताई गायकवाड, योगिता रोठे यासह प्रमुख उपस्थितांनी सावित्रीमाईंच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले.
सामूहिक अभिवादन करून राष्ट्रगीताने अभिवादन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 यशस्वीतेसाठी आझाद हिंद महिला संघटना, बहुजन महिला संघटना, मातृतीर्थ रणरागिनी संघटना, किसान ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 9 4 8 5 8
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *