राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख, श्री. पंडित कांबळे

Khozmaster
1 Min Read
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख, श्री. पंडित कांबळे
या ठिकाणी सर्व जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की, आपल्या विभागामध्ये असणाऱ्या सामाजिक न्याय विभागातील ५९ जातींना एकत्रित गोळा करण्याचे काम आगामी काळामध्ये आपल्याला करायला पाहिजे. आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत त्याची सुरुवात आम्ही सातारा येथे केलेली आहे. दोन हजार मातंग समाज बांधवांच्या उपस्थितीत झालेली मातंग परिषद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या सर्व ५९ जातींच्या परिषदा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्याचा सामाजिक न्याय विभागाचे मानस आहे.
महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर जे काही अन्याय व अत्याचार चालू आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून तुम्ही त्यांचे वकील बना, त्यांचे प्रवक्ते व्हा व त्यांचे आशीर्वाद घ्या. सामाजिक न्याय विभागाची संघटना बांधणी करत असताना अत्यंत बळकटीने हा विषय आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. मोदी आणि शहा या देशाचे मालक नाहीत. संघाचे व भाजपाचे लोक तुमच्याकडे येतील व तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतील, त्याला बळी पडण्याचे कारण नाही.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात श्री. पंडित कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
0 9 4 6 8 1
Users Today : 31
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *