राज्याचे कर्तव्यदक्ष मा.ना.श्री एकनाथजी शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र झंझावाती दौरा आयोजित केला असून त्यानुसार संपूर्ण राज्यभर जाहीर सभांचे आयोजन केले आहे.हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दि.10 जानेवारी 2024 रोजी कळमनुरी तालुक्यातील बाळापूर येथे जाहीर सभा होणार आहे.या सभेची जय्यत तयारी सुरू आहे.सभेसाठी नियोजित असलेल्या मैदानाची आज पाहणी केली. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे , संपर्कप्रमुख आनंदराव जाधव,नांदेड जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर, संजय बोंढारे, विजयराव बोंढारे, मोहनसिंग बयास, शेषेराव बोंढारे, अशोक उमरेकर, तालुकाप्रमुख रामप्रसाद घुगे, विवेक देशमुख, सचिन पेंढारकर, बबन हेंद्रे, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर, पांडुरंग बोंढारे , राघवेंद्र शितोळे, संजय इंगळे, बबनराव बोंढारे, श्याम वानखेडे, बबनराव माळोदे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते