आज संजयनगर, छत्रपती संभाजीनगर येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास केंद्रीय उपस्थित होतो.केंद्र सरकारचे महत्वाकांक्षी योजनांचे फायदे तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत’ याच स्पष्ट हेतूने केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि भारताचे पंतप्रधान मा.श्री. Narendra Modi जी यांच्या संकल्पनेतून सुरूवात करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा हा केंद्र शासनाचा हा अतिशय महत्वाकांक्षी आणि जनहिताचा असा हा उपक्रम आहे.या ठिकाणी आयुष्यमान भारत,पंतप्रधान आवास योजना,पंतप्रधान उज्वला योजना,पीएम स्वनिधी,स्टार्टअप इंडिया,पीएम जीवन ज्योती विमा योजना,पंतप्रधान मुद्रा योजना,सुकन्या समृध्दी योजना,पोषण आहार योजना,विश्वकर्मा योजना आदी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. याप्रसंगी माझ्यासह महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री.पाटील,महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.मंडलेचा,माजी नगरसेवक सखाराम पोळ,गजानन डोळस,सुनील जगताप,सुनील भिसे,रामकृष्ण भालेकर,संजय जाईबहार,कचरू घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.