मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कर्जवाटप योजना!

Khozmaster
1 Min Read
सुशिक्षित बेरोजगार मुस्लिम युवक आणि युवतींना उद्योग उभारण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून १० ते २० लाखापर्यंत वार्षिक ८% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, यासाठी वयोमर्यादा १८ ते ६० अशी असेल..
योजनेसाठी ८ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. त्याचप्रमाणे शिक्षण घेण्याकरिता शैक्षणिक कर्ज सुद्धा उपलब्ध आहे. शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ लाखापर्यंत असून फक्त ३% वार्षिक व्याजदर आहे व त्यासाठी कोणतीही मुदत नाही..
अर्ज आपणास पाठवल्यानंतर तो प्रिंट करून घ्यावा व सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रतिष्ठान भवन येथील आपल्या कार्यालयात प्रा.श्री.किरण आवटे सर (संपर्क क्रमांक – ९८५०५०९९२०) यांच्याकडे जमा करावा..
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे –
१. आधारकार्ड
२. अधिवास प्रमाणपत्र (Domcile Certificate)
३. अल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)
४. तहसिलदार यांनी निर्गमित केलेले उत्पन्न प्रमाणपत्र (मूळ प्रत)
५. जन्म दिनांकाचा पुरावा
६. शिधापत्रिका (रेशन कार्ड)
७. GST नंबर धारक कोटेशन प्रमाणपत्र (मूळ प्रत)
८. व्यवसायाच्या जागेचे गुमास्ता लायसन / शॉप ॲक्ट लायसन्स व विद्युत बील
९. राष्ट्रीयकृत बँक पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत
१०. राष्ट्रीयकृत बँकेचे (२० Post Dated Cheque / ECS) धनादेश
११. पॅन कार्ड
जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आत्मनिर्भर धाराशिवच्या स्वप्नाकडे एक पाऊल टाकावे..
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी कृपया खालील लिंकला क्लिक करा..
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *