आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख मा डॉ ओमप्रकाशजी शेटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांची आढावा बैठक संपन्न झाली, या बैठकीस उपस्थित राहून औसा मतदारसंघाशी संबंधित विषय मांडले. या बैठकीदरम्यान निम्नलिखित विषयांवर चर्चा झाली/अभियान प्रमुख डॉ ओमप्रकाशजी यांनी निम्नलिखित सूचना दिल्या:

औसा शहरातील ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय म्हणून दर्जोन्नत करण्यास मंजुरी मिळाली आहे पण सदरील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असलेली निवासस्थाने ही राहण्यासाठी धोकादायक झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून या निवासस्थान बांधकामासाठी पंचायत समिती, औसाच्या समोरील पशुसंवर्धन विभाग कार्यालय समोरील खुली जागा आरोग्य विभागास हस्तांतरित करण्यात यावी व याठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान निधी अंतर्गत निवासस्थान बांधकामास प्राधान्याने मंजूरी देण्यात द्यावी.

औसा मतदारसंघातील उपकेंद्रांच्या इमारती जीर्ण झाल्या असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना उपकेंद्रांच्या ठिकाणी निवासस्थान नाहीत त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सदरील उपकेंद्र बांधकाम व निवासस्थान बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात यावा.

लातुर जिल्हयातील जिवनदायी व आयुष्यमान भारत योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयाची संख्या कमी आहे, त्यात वाढ करण्यात यावी.

आरोग्य विभागाच्या योजनेमध्ये कोणते १२०० आजार समाविष्ठ आहेत याबाबत गावपातळीवर प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रत्येक ग्रामसभेत या योजनेचे सविस्तर चावडी वाचन करण्यात यावे तसेच उमेद /माविम अंतर्गत कार्यरत सर्व महीला बचत गटांना गावनिहाय या आरोग्य योजनेची सविस्तर माहिती देण्यात यावी.

औसा विधानसभा मतदारसंघात 100% आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जिवनदायी योजना चे कार्ड वितरण करण्यात यावे.

108 च्या रुग्णवाहिका जुन्या झाल्या असून नविन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात याव्यात
तसेच कार्डियाक रुग्णवाहिका किमान उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात याव्यात.
यावेळी मा जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.