मौजे ढाळेगाव येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत १० लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. ग्रामस्थांशी सुसंवाद साधत कामाचे भूमिपूजन केले. तसेच नवीन वर्षानिमित्त सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत आभार मानले. तसेच यावेळी श्री संत नारायण अप्पा देवस्थान येथे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
आपल्या माध्यमातून मतदारसंघात दळणवळणाची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी नेहमी प्रयत्नशील राहून रस्ते दुरुस्ती, रस्ते कामे आदी कामे पूर्ण झाली आहेत. पुढील काळात देखील मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहून विकास साधला जाईल, असे मत व्यक्त करत विश्वास दिला.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. नामदेव महाराज कदम, विश्वंभर पाटील, संचालक शिवाजीराव पाटील, चेअरमन बापूमामा सारोळे, सरपंच प्रतिनिधी ब्रिगंणे, बाबुराव कदम सर, शंकरराव कदम सर, चेअरमन हरिभाऊ कदम, गिरीधर पौळ, सरपंच बंडू भाऊ ढाकणे, उपसरपंच वंजार वाडी, गोपाळ जटूरे, माजी सरपंच धसवाडी अविनाशजी देशमुख, येस्तार कलमे मामा, विष्णूजी आलापुरे, बालाजी कदम, पंडित शेकडे, दशरथ कदम, माधव कदम, प्रभातराव कदम आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त इंजि. ह.भ.प. लक्ष्मण महाराज कदम यांनी केले.