नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना व विशेषकरून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी गठित मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज संपन्न झाली. यावेळी उपस्थित राहून विभाजन झाल्याने गठीत नवीन महसूल मंडळांचा दुष्काळग्रस्त व दुष्काळसदृश यादीत समावेश करण्याबाबत सूचना केली.
रब्बी हंगामाच्या सुरुवातीस अवकाळी पावसाने केलेले नुकसान तसेच बदलत्या हवामानामुळे धोक्यात आलेली पिके, यांचे पंचनामे पूर्ण करून मदती संदर्भातील अहवाल तातडीने मागवावेत, याबाबतही चर्चा झाली.
यावेळी सहकारमंत्री ना.दिलीप वळसे पाटील साहेब, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, मदत व पुर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Users Today : 30