तुम्ही दिला अर्थ स्त्री जन्माला, आमचा त्रिवार प्रणाम या कार्याला !

Khozmaster
2 Min Read
अभिमानास्पद क्षण आज अनुभवता आला. ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे प्रतिवर्षीप्रमाणे #जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा #सन्मान माझ्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये
पूजा गोरे(पी.एस.आय.),
प्रा.पुजा राऊत(प्राध्यापक),
शुभांगी परमार(क्रिकेट कोच) ,
मयुरी मुंडे(योगा आणि हॉकी),
संध्याराणी कोल्हे(शिक्षिका),
ऋतुजा ठोके(सहकार अधिकारी) ,
आर्यन वाकडे(क्रिकेट) तसेच विविध शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांशी तसेच उपस्थितांसोबत मनमोकळे पणाने संवाद साधला.
यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना सवित्रीमाईंचे काम हे आजही आपल्याला प्रेरणा देणारे आहे आणि आपणही त्यांची प्रेरणा घेऊन पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील असं काम करण्याचा प्रयत्न करूया असे मत व्यक्त केले.
यावेळी मा.दिलीप सांगळे, डॉ.अतुल देशपांडे, श्री.महादु मस्के, डॉ.सोनाली मस्के, मा.बाबुरावजी आडे, डॉ.सुरेश अरसूडे, मा.न.भा. वालवडकर, मा.वर्षा मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आणि सौ.संगीता काटे, प्रा.जयश्री डाके,सौ.अंजली अरसूडे, सौ.सुनीता जाधव , सौ. अनिता किर्दंत, सौ.मसने मॅडम, ज्ञानज्योती सावित्रीमाई जोतीराव फुले जन्मोत्सव समिती अंबाजोगाईचे आयोजक अनंत आरसुडे ,बळीराम चोपणे, पद्माकर काटे, गणेश रुद्राक्ष, सुनील मस्के, मंदार काटे ,प्रशांत आदनाक, अजय राठोड, श्री.सुरेश मुकडे, श्री.विष्णु राऊत, श्री. प्रकाश चोपणे, श्री डांगे,वेंकटेश किर्दत ,गोपाळ मस्के,महेश अंबाड, राणा चव्हाण,सुरेश नांदे सर प्रदिप चोपणे ,अक्षय शिंदे, योगेश कडबाने,आनंत मसने,अमोल घोडके ,पवन जिरे, ओंकार पोतदार ,पवन घोडके,निकेश जगदाळे, विष्णु जाधव, अमोल साखरे,अक्षय भूमकर ,अतुल कसबे ,सत्य प्रम इंगळे,सचिन केंद्रे, सचिन वाघमारे, माऊली वैद्य, सय्यद अन्सार,शरद करपे, श्री. अविनाश आडे, श्री. अविनाश आडे, व खोलेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक व्रंद कर्मचारी , विद्यार्थी ,विद्यार्थीनी आणि नागरिक यांची मोठ्या प्रमानात उपस्थिती होती.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *