गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूर बदनापूरच्या तहसीलदार सुमन मोरे यांना लाच घेताना रंगेहात पकडले.येथे युनिट जालना तक्रारदार पुरुष वय-२८ वर्षे आरोपी १) श्रीमती सुमन उध्दवराव मोरे, वय ५० वर्षे, पद – तहसीलदार, वर्ग -१, तहसील कार्यालय बदनापुर जि. जालना रा. अप्रतिम वास्तु, चाटे स्कूल जवळ, सातारा परीसर, छत्रपती संभाजीनगर.
२. निलेश धर्मराज गायकवाड, वय – ३४ वर्ष, व्यवसाय नोकरी महसूल सहायक, तहसील कार्यालय बदनापुर जि. जालना, वर्ग -३ रा. पोलीस कॉलनी, पोलीस मुख्यालय जालना जि.जालना लाचमागणी पडताळणी
दि. ०३.०१.२०२४ आलोसे कं १ व २ यांनी मिळून ३०,००० रुपये लाचेची तहसीलदार कॅबीनमध्येच पंचासमक्ष मागणी केली. लाच मागणी रक्कम आलोसे क्र १ व २ यांची ३०,००० रुपये. लाच स्वीकृती दिनांक दि.०३.०१.२०२४ रोजी आलोसे क्रमांक २ याने स्विकारून आलोसे क्र १ यांचेकडे दिले. लाच स्वीकारली रक्कम
दि.०३.०१.२०२४ रोजी ३०,००० रुपये. गुन्ह्याची थोडक्यात हकीकत तक्रारदार यांचे आजोबांचे नावावरील बदनापुर शिवारातील गट क्र ८५, ८६ व मौजे रामखेडा शिवारातील गट क्र ९ मधील शेत जमीन आजोबा मयत झाल्यानंतर वारस म्हणून तक्रारदाराचे चुलते यांचे नावाने एकत्रित कुटुंबकर्ता म्हणुन ७/ १२ वर भोगवटादार नोंद घेण्यात आली होती. तसेच तक्रारदार यांचे वडीलांसह इतर वारसांची सामाईक क्षेत्र इतर अधिकारात ६ क मध्ये वारस म्हणून नोंद घेण्यात आली होती. त्यावरून एकत्रित कुटुंबकर्ता ही नोंद कमी करुन इतर वारसांची नावे ७/१२ उताऱ्यावर नोंद करून फेर करण्याचा आदेश काढुन देण्यासाठी आलोसे क्रमांक १ व २ यांनी ३०,००० रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष केली.
सापळा कारवाई दरम्यान यातील आलोसे क्रं.२ यांनी पंचासमक्ष तहसील कार्यालयात लाचेचे ३०,००० रुपये स्वतः पंचासमक्ष स्वीकारुन आलोसे क्र १ यांचेकडे कॅबीनमध्येच नेवून दिल्याने त्यांना लाचेचे रकमेसह पंचासमक्ष त्यांचे कॅबीनमध्येच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचेकडुन लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आलोसे यांचे विरुद्ध पोस्टे बदनापुर जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे. सापळा अधिकारी व तपास अधिकारी किरण एम बिडवे, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना मार्गदर्शक संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर राजीव तळेकर अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजी नगर. सापळापथक पोलीस अंमलदार शिवाजी जमधडे, गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे. मा. पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर तसेच पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना
Users Today : 9