१८ जानेवारी रोजी मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य मेळावा

Khozmaster
2 Min Read
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनिल तटकरे यांची पत्रकार परिषद पार्टीच्या मुंबई येथील संपर्क कार्यालयात पार पडली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांसमोर मांडली. युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने परभणी आणि धाराशिव येथे दोन भव्य मेळावे घेण्यात येणार असून या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मी आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे व इतर नेते उपस्थित असतील, १८ जानेवारी रोजी मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य मेळावा मा. अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील पक्षाचे अन्य सहकारी यांच्या उपस्थितीत होईल, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पार्टीच्या विधानसभा आमदारांच्या मतदारसंघात प्रमुख नेत्यांचे संयुक्त दौरे आयोजित करण्यात येतील, असे तटकरे यांनी सांगितले.
यासहीत १४ तारखेला राज्यातील सर्व जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून मेळावे होणार आहेत. या मेळाव्यात आगामी निवडणुकीत असलेल्या भूमिकेवर प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. मेळाव्याच्या नियोजनासाठी महायुतीमधील सर्व मित्रपक्ष आणि घटक पक्षांची बैठक येत्या ५ जानेवारी रोजी दादाजी भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात महायुतीच्या माध्यमातून राज्यातील सहा महसुली विभागात फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सहा भव्य मेळावे घेण्यात येतील.
पुढे तटकरे म्हणाले की, आज पक्षाच्या विविध सेलच्या नियुक्त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. कर्जत येथे झालेल्या वैचारिक मंथन शिबिराच्या माध्यमातून पक्षाची स्पष्ट भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली. त्यातून राज्यात पक्षाला मोठं पाठबळ मिळाल्याचे दिसतय याचा अभिमान वाटतो. यानंतर माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर प्रदेशाध्यक्षांनी भाष्य केले. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, संग्राम कोते पाटील आदी उपस्थित होते.
0 9 4 6 8 2
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *