राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस, प्रवक्त्या प्रा. सुशीलाताई मोराळे
लोकशाही, संविधान व देश वाचवण्याचे फार मोठे संकट आपल्यासमोर येऊन ठेपलेले आहे. या संकटाचा सामना करत असताना ज्या ज्या वेळी फॅसिस्टांनी आपले डोके वर काढले त्या त्या वेळी या देशातील समाजवादी चळवळीने आणि आता आदरणीय पवार साहेब त्यांच्याविरुद्ध संघर्ष करताना आपल्याला दिसत आहेत. या फॅसीजमला हरवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने अघोषित आणीबाणीच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे.
देशाच्या या आधीच्या इतिहासात आपण जर बघितलं तर प्रत्येक प्रधानमंत्री यांनी देशाला काही ना काहीतरी देण्याचे प्रयत्न केले. नेहरूंनी आयआयटी, एम्स व इस्रो दिलं, लाल बहादूर शास्त्रींनी “जय जवान, जय किसान” चा नारा देऊन या देशातील शेतकऱ्याला सुखी व समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून संस्थानिकांची तनके बंदी केली व “गरीबी हटाव” चा नारा देऊन या देशाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यानंतर नरसिंहराव यांनी नवीन आर्थिक धोरण उदारीकरणाचा सिद्धांत आपल्या देशात अंमलबजावणी केला, राजीव गांधी यांनी टेली कम्युनिकेशनची क्रांती घडवून आणली. व्ही पी सिंग यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करून सरसकट कर्जमाफी केली. अटल बिहारी वाजपेयी यांनी कारगिलचे युद्ध जिंकवून दिले. मोदींनी आपल्याला काय दिले? गाय, गोबर, अच्छे दिन आणि मन की बात या पलीकडे कोणी चर्चा करायला तयार नाही. आपले जन संघटन जोपर्यंत आपण गावागावात मजबुतीने घेऊन जाणार नाही तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये पवार साहेबांचे विचार पोहोचणार नाहीत. मनुस्मृतीचे संविधान आपल्याला या देशात येऊ द्यायचे नाही ही महिलांची जवाबदारी आहे.
भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की, “बहारों में बैठकर ये चमन बेचेंगे, जमीन पर बैठकर ये आसमान बेचेंगे, मत दो इनके हाथ में इस देश के २०२४ की चाबीया, ये तो मुर्दो के कफन बेचेंगे” यांचे संकल्प रथ आपण गावागावातून परतवून लावले पाहिजेत व या दहा वर्षात यांनी काय केले? याचा हिशोब घेतला पाहिजे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Users Today : 32