शिवसेनेना शहर प्रमुखासह दोघांचा जागीच मृत्यू.

Khozmaster
1 Min Read
देवेंद्र सिरसाट.दै, खोजमास्टर नागपुर .नागपूर येथून एक भीषण अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भरधाव असलेल्या टेम्पोने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी मोटर सायकलला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात शिवसेना ठाकरे गटाचे भिवापूर शहर प्रमुख विजय दिनकर हेडाऊ वय 35 वर्ष आणि अजय अरुण रामटेके वय 25 वर्ष या दोघांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
उमरेड मार्गावर शुक्रवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास विजय हेडाऊ हे अजय रामटेके यांना सोबत घेऊन स्वत:च्या दुचाकी मोटर सायकलने किन्हाळाकडे जात होते. याच दरम्यान, आयटीआय जवळ नागपूरकडून नागभीडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने एमएच 33 टी 0590 हेडाऊ यांच्या दुचाकी मोटर सायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात विजय आणि अजय या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या भीषण अपघातानंतर टेम्पो चालक राजू दशरथ ठाकरे रा. नागभीड जिल्हा चंद्रपूर हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याला पोलिसांनी वाहनासह ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणि पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *