धाराशिव बदलतंय! इतर आकांक्षीत जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्या धाराशिव जिल्हा सरस!!
धाराशिव ६४ व्या क्रमांकावरून आता ८ व्या क्रमांकावर आले आहे.. लवकरच यादीतून बाहेर पडून विकसनशील जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत..
२०१८ मध्ये देशातील ११२ जिल्ह्यांना आकांक्षित म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यावेळी या जिल्ह्याचा ६४ वा क्रमांक होता. धाराशिव ८ व्या क्रमांकावर आहे. केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी १ जानेवारी रोजी तुळजापूर येथे जिल्ह्याचा आढावा घेताना याविषयी विशेष समाधान व्यक्त करून जिल्ह्याचे अभिनंदन केले..
निती आयोगाने धाराशिव हा आकांक्षित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे. आकांक्षित जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या निकषानुसार सुरू असलेल्या कृषी, जलसंधारण, आरोग्य, पायाभूत सुविधा विकास यासह बँकिंग क्षेत्राचा आढावा घेण्यात
आला..
आला..देशातील ११२ आकांक्षित जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याचा चौथा क्रमांक, आरोग्य क्षेत्रात ११ वा तसेच कृषी क्षेत्रात १० वा क्रमांक आहे. एकंदरीत ८ वा क्रमांक असणे हे समाधानकारक आहे..
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना जगातील सर्वात मोठी योजना आहे. गोरगरीब आणि गरजू रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत दिलासा या योजनेमुळे मिळाला आहे. आपल्या जिल्ह्यात १२ लाख नागरिक प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी पात्र असून ३ लाख ५० हजार नागरिकांना हे कार्ड मिळाले आहेत. उर्वरित नागरिकांनाही कार्ड उपलब्ध होतील ज्यातून त्यांना ही सुविधा मिळू शकेल..
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत १२ हजारपैकी १० हजार ३०० घरे बांधण्यात आली. उर्वरित घरेही लवकरच लाभार्थ्यांना मिळतील. जिल्ह्यात कृषी सन्मान योजनेत २ लाख २७ हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. पिकांच्या झालेल्या नुकसानाबाबत शासनाकडून २१८ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे..
एकंदरीतच धाराशिव जिल्ह्याची होणारी प्रगती ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. धाराशिव बदलतंय, त्याला सर्वांगीण दृष्टीने विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे अधिक हिताचे ठरेल..
Users Today : 28