नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजनासंदर्भात मतदारसंघातील व जिल्ह्यातील युवा सहकाऱ्यांशी संवाद साधला.
मतदारसंघस्तरावर १२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून त्यासंदर्भात आज औसा येथील निवासस्थानी मतदारसंघातील व जिल्ह्यातील युवा सहकाऱ्यांसोबत नियोजनात्मक बैठक संपन्न झाली. “नमो चषकात क्रिकेटसह कुस्ती, कबड्डी व खो – खो सारख्या मातीतील खेळांचाही समावेश असून ग्रामीण भागातील तरुणांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत” असे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीत जबाबदारी मिळालेल्या युवा सहकाऱ्यांचा यावेळी सत्कार करून शुभेच्छाही दिल्या.

यावेळी पक्षातील सहकारी सर्वश्री श्री सुभाष जाधव, श्री ज्ञानेश्वर वाकडे, श्री चंद्रशेखर सोनवणे, श्री किरण उटगे, श्री प्रवीण कोपरकर, श्री अमोल निडवदे, श्री अरुण पाठक, श्री अजित पाटील कव्हेकर, श्री रविशंकर केंद्रे, श्री दत्ता चेवले, श्री हृषीकेश कराड, श्री गोपाळ धानुरे, श्री वामन मुळे, श्री नितीन कवठाळे, श्री सचिन अनसारवाडे, श्री युवराज पाटील, श्री सुरेश भुमरे, सौ सोनालीताई हाडोळे पाटील, सौ कल्पनाताई ढविले, सौ माधुरीताई पाटील व युवा मोर्चाचे पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 28