ऊस तोडणी व वाहतूक मजुरांच्या दरवाढीच्या प्रश्नाबाबत काल पुण्यातील साखर संकुल येथील साखर संघाच्या कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न झाली.

Khozmaster
1 Min Read
ऊस तोडणी व वाहतूक मजुरांच्या दरवाढीच्या प्रश्नाबाबत काल पुण्यातील साखर संकुल येथील साखर संघाच्या कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न झाली.
बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्वांच्या मान्यतेने सन २०२०-२१ ते २०२२-२३ या ३ गाळप हंगामाच्या करारावर ३४% वाढ, तसेच मुकादम कमिशनमध्ये १% वाढ करून तो २०% करावा असा तोडगा निघाला, सदर वाढ ही चालू गाळप हंगामापासून कार्यरत होऊन पुढील २ हंगामाकरिता म्हणजेच एकूण ३ गाळप हंगामासाठी लागू राहील. यावेळी सर्व संघटनांनी तसेच साखर उद्योगाचे प्रतिनिधी व साखर संघ यांनी हा तोडगा मान्य केला.
यावेळी, आमदार श्री. जयंतराव पाटील, श्रीमती पंकजा मुंडे, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष श्री. जयप्रकाश दांडेगावकर, साखर संघाचे अध्यक्ष श्री. पी. आर. पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश सोळंके, साखर संघाचे उपाध्यक्ष श्री. प्रतापराव ओहोळ तसेच साखर संघाचे संचालक श्री. हर्षवर्धन पाटील, श्री. प्रकाश आवाडे आणि श्री. कल्याणराव काळे यांच्यासमवेत ८ संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
0 9 4 6 8 2
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *