न जाने कौन मुझे दुवाओमे याद करता हैं जब भी डुबने लगता हूं दरिया बाहर उछाल देता है-डॉ.सुभाष लोहिया

Khozmaster
2 Min Read
खोजमास्टर-अविनाश लाड. मेहकर:-माणुस हा या पृथ्वीतलावर एक पाहूणा असून माणसाचे कधी काय होईल हे काहीच सांगता येत नाही मला मध्ये एकदा छातीत दुखायला लागले आणि सहजपणे चेकअप करायला गेलो आणि मला मायनर अटॅक आल्याचे समजले म्हणून एंजोप्लास्टी करुन आलो आणि यावर डॉ सुभाष लोहिया म्हणाले की “न जाने कौन मुझे दुवाओमे याद करता हैं जब भी मै डुबने लगता हूं दरिया बाहर उछाल देता है” अर्थातच मी जीवनात जे काही चांगले काम केले त्यामुळे ज्यांचे मी चांगले केले ते मला अंत:करणातून आशिर्वाद देत असतात त्यामुळेच मी आज आपला सत्कार करण्यासाठी आपल्या पुढे उभा आहे असे सुभाष भाऊंनी उपस्थित पत्रकारांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना केले.यावेळी व्यासपीठावर महेश अर्बन परिवाराचे उदय सोनी,दिपक मवाळ, डॉ पवन मंत्री, तनशीराम मानघाले पत्रकार दत्ता उमाळे, ज्ञानदेव मानवतकर, सिताराम महाराज ठोकळ सत्कारमूर्ती पत्रकारद्वय युनुस बागवान, ज्ञानेश्वर इंगळे आदींची उपस्थिती होती
मेहकर शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून महेश विद्या मंदिर यांचा नावलौकिक संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आहे अशा संस्थेच्या महेश परिवाराच्या वतीने गेल्या २३ वर्षांपासून देशाचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्राच्या पत्रकारांचा सत्कार “महेश रत्नं”पुरस्कार देऊन करित असतात खरोखरच महेश परिवारातील सदस्य अत्यंत मोठ्या मनाचे असल्याने ते कोणत्याही पध्दतीने का होईना पत्रकारांच्या कार्याचे मुल्यमापन करीत असतात यंदा महेश परिवाराच्या वतीने मेहकर शहरातील नामांकित पत्रकार शेख युनुस शेख वाहेद व दुसरा पुरस्कार ज्ञानेश्वर भरत इंगळे या वृतपत्र वाटत वाटत एका साप्ताहिकाचा मुख्य संपादक बनलेल्या कर्तृत्ववान युवकाला बहाल केला या कार्यक्रमाला मेहकर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार फिरोज शाहा यांनी केले तर आभारप्रदर्शन महेश अर्बन परिवाराचे सिताराम महाराज ठोकळ यांनी मानले
0 9 4 2 3 0
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *