Khozmaster
2 Min Read

 

 

खोजमास्टर-अविनाश लाड.

 

अनिल समाधान पाटील यांचा जन्म जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड सारख्या एका छोट्याशा गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात

७ जुलै १९६४ रोजी अनिल भाऊंचा जन्म झाला.

अनिल भाऊंनी प्राथमिक शिक्षण मडाखेड येथे केले

आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी ते अकोला येथे गेले आणि त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा केला

शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांच्या प्रेरणेतून १९९५ साली अनिल भाऊंनी सर्वप्रथम ग्रामीण भागात दैनिक देशोन्नती च्या माध्यमातून पत्रकारितेस सुरुवात केली नंतर तालुका स्तरावर देशोन्नती तालुका प्रतिनिधी या पदावर कार्य करीत आज पर्यंत दैनिक देशोन्नती मध्ये कार्यरत आहेत मागील जवळपास ३२ वर्षांपासून अनिल पाटलांनी ग्रामीण भागातील जनतेच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम सातत्याने अविरतपणे केले असून खेड्यापाड्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी हेलपाटे मारायला लावणा-या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून

केले.त्यानंतर अनिल पाटलांनी जळगाव जामोद येथे तालुक्याच्या ठिकाणी देशोन्नतीचे कार्यालय उघडले आणि तळागाळातील लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले अनिल भाऊंनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अग्रस्थानी ठेवून संत गाडगेबाबा,डॉ.अब्दुल कलामांना गुरुस्थानी मानून समाजकारण राजकारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली पत्रकारितेतील पोलीस अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी देशोन्नती मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे, बुलढाणा आवृत्ती प्रमुख राजेश राजोरे यांच्यासह पत्रकारांनी अनिल पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दिलेली साथ व त्यातूनच नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी आवाज उठवून विधानसभेत आणलेला स्थगन प्रस्ताव आणि संपूर्ण पत्रकारांनी एकजुटीने दिलेली साथ हा अनिल भाऊंच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग असल्याचे ते आवर्जुन सांगतात,तसेच अनिल भाऊंच्या मुलाचा भीषण कार अपघात झाला व त्यातून त्याचा प्राण वाचला त्यावेळी पत्रकारांसह मित्र मंडळींची मिळालेली अनमोल साथ हे ही अनिल भाऊंच्या जीवनातील कधीच न विसरता येणारा अविस्मरणीय प्रसंग असल्याचे सांगून अनिल भाऊ चढ उताराच्या कार्यकाळात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा सर्वांच्या ऋणातच राहाण्याचा मानस बोलून

दाखवला.

0 9 4 8 6 0
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *