खोजमास्टर
मेहकर:-“वाल्याचा वाल्मिकी” झाला एकवेळ विस्तवालां हाताशी धरावा परंतु रमेशला नाही ..
अशा प्रकारचे भयभीत उदगार कधीकाळी मेहकर शहरातीलच सर्वसामान्य जनतेमधून तथा राजकीय क्षेत्रामधून चर्चेत असायचे. सामाजिक क्षेत्रात दबंग कामगिरी करणारा नडलां तिथं भिडला अशी भूमिका ठेवणारा निर्भय,निडर निर्भीड,आणि निधड्या छातीचा अशा व्यक्तिमत्वाचा धनी असलेला एक परमकोटीच्या जिद्दीचा धनी म्हणजेच रमेश भीमराव चव्हाण हा मेहकरच्या सर्वसामान्य कुटुंबातील युवक.
दैनंदिन जीवनात ज्याच्या एका हाकेला हजारो युवक प्रतिसाद देत असत राजकीय मिरवणूक,धार्मिक उत्सव,ठोश्यास ठोसा अशा प्रकारच्या भुमिका बजावतांना रमेश चव्हाण यांच्यावर अनायासे राजकीय गुन्हेगारी दाखल होत न्याय प्रणाली मध्ये दखल-अदखलपात्र गुन्ह्यांचा डोंगरच उभा राहिला.
आणि सर्वसामान्य युवा रमेशचा,’रमेशदा’ कधी झाला हे त्यालाही कधीच कळलेच नाही परंतु अंगात तरुणाईचे वारे सळसळत होते, आणि अंगी मुळातच स्वामिनिष्ठतां, प्रामाणिकपणां,जिद्द , चिकाटी आदी गुणांचा संचार असल्यामुळे आपले राजकीय गुरु विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या कर्तृत्वाचे ‘वेडं’ ध्यानीमनी ठेवत रमेशने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारधारा अंगीकारत राजकीय क्षेत्रात दे-दणादण कारकीर्द रंगवली.
आपली पक्षनिष्ठां आणि स्वामीनिष्ठां व स्वामीहितासाठी कर्म करीत करीत केलेलं कर्म कधी कुकर्म ठरलं,आणि पाऊले गुन्हेगारीकडे कशी वळलीत हे रमेशलाही कधीच उमगलही नाही. टप.. टपोरी वागणं,भाईगिरी चा तोरा मिरवणाऱ्या रमेशच्या मागे मग लागला पोलिसांचा ससेमिरा.आणि नकळतपणे हळूहळू रमेश पासून मेहकर तालुक्यातील सुशिक्षित,विद्वान,चांगला समाज दुर होत होता तर दुसरीकडे पक्षातीलच लोकांना रमेशची अडचण भासू लागली काही नेत्यांना रमेश वरचढ भासू लागला आणि रमेशची लोकप्रियता,दरारा वाढला तर आपलं अस्तित्वं नष्ट होऊन भविष्यात रमेश मोठ्ठा होईल अशा भितीने रमेशचे नेतृत्वं सर्वांना नकोसं होवू लागलं …..
आणि काही चाणाक्षांनी रमेशच्या सोबतच्या काही गद्दारांना हाताशी धरुन रमेशच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे कामं केले आणि त्यावेळच्या कथीत स्वयंघोषित “डॉनने” रमेश चव्हाण यांच्या विरोधात एक षडयंत्र रचले आणि त्यांना योगायोगाने साथ लाभली त्या ‘टकलु’ हैवानाची परंतु “जाकों राखे साई,मार सके ना कोई” या उक्तीं प्रमाणे काळ आला होता,पण वेळ आली नव्हती.
त्यामुळे हा सगळा सावळा गोंधळ तथा कर्मकांड बघून रमेशच्या स्वामींनी निमुटपणे
स्वयंघोषित डॉन व कथीत टकलु हैवान गॅंगची बाजू घेतली.
स्वामींच्या ह्या भुमिकामुळे रमेश चव्हाणच्या डोक्यावर आभाळच फाटलं, क्षणांत होत्याच नव्हत झालं आणि स्वामींच्या बंधू प्रेमातं स्वामीनिष्ठं,एकनिष्ठं, प्रामाणिकं,जिद्दी,भक्ताचां मात्र नाहक बळी गेला.
आणि म्हणतात ना सिंह आराम करीत असतांना कोल्ही-कुत्री रान गाजवतात, तसंच काहीसं रमेश चव्हाण यांच्या बाबतीत घडलं आणि मग वाल्या कोळ्याला जसा प्रश्न पडला तसाच प्रश्न ”रमेशदा” यांना पडला असावा..कोणासाठी, कशासाठी,का ? हे कर्मकांड… करावे.. आणि मग रमेश चव्हाणांची वाममार्गाला सोडून सत्मार्ग स्विकारण्याची इच्छा जागृत झाली परंतु हे तेवढं सोपं नव्हतं,कारण आतापर्यंत जे हितचिंतक होते तेच आता रमेशचे मोठे शत्रू बनले होते,भाऊसुध्दा साथ द्यायला धांदरुन गेला होता अगदी सावली सुध्दा साथीला उरली नव्हती. अशातच ज्यांच्यासाठी आयुष्य पणाला लावलं आता साक्षात तेचं जिवावर उठले होते,स्वामिनिष्ठतेचं हे मोठं बक्षीस मिळाले अगदी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा दाखला देत चाटुगिरी करणा-या मेहकर पोलीस स्टेशनच्या तात्कालीन ठाणेदार शिंदेला हाताशी धरुन सात जिल्ह्यांतून रमेश चव्हाण ला ”तडीपार” करण्यासाठी राजकीय दबाव आणला गेला परंतु वाममार्गावर चालतांना काही सत्कर्मही पदराशी असल्याने इथे सुद्धा तात्कालीन दिवंगत गृहमंत्री आर.आर.(आबा) पाटील धावून आले.त्यांनी सत्य परिस्थिती पडताळून आणि गृह खात्याच्या गोपनीय अहवालातून अतिशय सावधपणे परिस्थिती हाताळली आणि तशा गंभीर परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील युवानेते आणि नासाचे शास्रज्ञ बाळासाहेब दराडे हे ठामपणे रमेश चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहिले होते.
म्हणतात ना मोडेल पण वाकणार नाही ही जात मराठ्यांची.ह्या म्हणीप्रमाणे रमेश चव्हाण यांनी एक ध्यासं मनाशी बाळगून त्यांच्या विरोधात कटकारस्थानं करण्यासाठी धडपडत असलेल्या कर्मकांडाच्या विरोधात सक्षमं उभं ठाकायची जिद्द ऊराशी बाळगत पत्रकारितेचा अचूक रस्ता निवडलां आणि तात्कालीन दिवंगत गुरुवर्य शंकर धावटेकर व उध्दव फंगाळ यांच्यामुळेच रमेश चव्हाण यांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रात पाय रोवले, आणि २०१० मध्ये विदर्भ मतदार या दैनिकात काम करण्यासाठी सुरुवात केली. राजकीयं सुत्रे तिथे शांत कशी बसणार होती त्यांनी रमेश चव्हाण यांच्या विरोधात कांड्या सुरुच ठेवल्या होत्या.परंतु दैनिक विदर्भ मतदारचे संपादक भाऊसाहेब बावणे यांनी रमेश चव्हाण यांच्याशी बंधूत्वाचं नातं निभावलं,तर मुख्य संपादक दिलीप एडतकर साहेबांनी,१९ फेब्रुवारी २०१५ ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तं आपल्या सहज दैनिकाला सुरुवात केली.आणि मुख्य संपादक म्हणून रमेश चव्हाण यांच्या कार्याला नवी दिशा दिली.
ऑगस्ट २०१२ मध्ये आधुनिक काळाच्या गरजेनुसार युट्युब चॅनेल ला सुरुवात केली. डिजिटल मिडिया ची नवी क्रांती आत्मसात केली. अनेक घोटाळे, डिबेटस, मुलाखत घेवून एक उत्तम संवादक असल्याचे पटवून दिले. जनसामान्यांच्या समस्या निर्भीडपणे सक्षम आणि मुद्देसूद मांडणी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर गावच्या एका सर्वसामान्य पत्रकाररुपी व्यक्तिमत्व आज रोजी पुणे सारख्या आय.टी.हब, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला शहरात महाराष्ट्र राज्यातील 25 जिल्ह्यातील सक्षम नेटवर्क 5 विभागत अमरावती,नागपूर,छ.संभाजीनगर,जळगाव खा. ,पुणे आपल्या दैनिक खोजमास्टर ची वाचकांना आवड निर्माण केली आहे. सोशल डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात अतिशय प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. तळागाळातील लोकांपर्यंत खोजमास्टर मिडिया लिमिटेड या कंपनीला पोहचवत लवकरच महाराष्ट्र राज्यातील नामांकित कंपनीत समावेश करण्याचा मानस आहे.
18 फेब्रुवारी 2024रोजी पुणे येथील कार्यालयात राज्यस्तरीय ‘खोज महाराष्ट्र रत्न पुरस्कार ‘ चा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विविध मान्यवर उपस्थित हा सोहळा समाजातील पत्रकार, उद्योजक, कलाकार, साहित्यिक, शिक्षक, विधीज्ञ ( वकील), इंजिनिअर, कंत्राटदार, राजकीय, अध्यात्मिक, क्रीडा, यांसह इतर अनेक क्षेत्रांत अनमोल कामगिरी चोख बजावली अशा प्रेरणादायी व्यक्ती चार आदरसत्कार करण्यात येणार आहे.
अशा प्रकारे आपल्या सकारात्मक विचारांना चालना देवून रमेश चव्हाण यांनी आपल्या भुतकाळातील कार्य पडद्याआड ठेवून सत्कार्य आणि सन्मार्गावर जीवनकार्य आरंभ केली आहे
मागील दशकात आपली कर्तबगारी बजावत असताना निडर -निर्भीड व्यक्ती असा ठसा समाजात उमटवत आहे .
वाल्हाचा वाल्मिकी झाला असे गौरवोद्गार कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते श्याम भाऊ उमाळकर अनेक वेळा आपल्या लाक्षणिक भाषणांमधून काढत असतात.
हे सगळं करताना रमेश चव्हाण यांच्यामधील खेळाडूवृत्ती बाहेर आली. देशभरात होत असलेल्या मेरेथान, ट्रायथलॉन, स्पर्धा मध्ये सहभागी होवून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदणी केली आहे.
आजही अनेक मार्गांवर आपल्या धुंदीत बेधुंद धावत असलेला, सायकलींग , स्विमिंग करणारा, जिथे अन्याय तिथे खोजमास्टर म्हणून पोल खोल सदर मधून फेसबुक,यु ट्यूब लाइव्ह येणारा हा तोच रमेशदा आहे का…?
कदाचित सर्वांना हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक
असणारं…
Users Today : 32