वसा लेखणीचा 🖋️

Khozmaster
7 Min Read

खोजमास्टर

 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे मुस्लिम कुटूंबात ४ जून १९७० साली जन्म झालेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले रफिकभाई कुरेशी यांच्या जीवनावर लिहायचेच झाल्यास एक मोठा ग्रंथ तयार होवू शकतो रफिक भाईंच्या जीवन प्रवासाला खरी सुरुवात झाली ती पत्रकार म्हणून,पुढे चालून मग नेता ते अभिनेता रफिक कुरेशी रफिक भाईंनी मेहकर शहरात एक सोज्वळ सर्वसामान्य गोरगरीबांना सोबत घेऊन चालणारा “एक भला माणूस” आशी एक ओळख निर्माण केलेली आहे पत्रकार रफिकभाई कुरेशी म्हंटले की मेहकर शहराच्या कानाकोपऱ्यातच नाही तर संपूर्ण मेहकर तालुक्यालाच त्यांचा परिचय आहे.

माणूस जीवन जगत असताना तो कसा जगला त्यांनी जीवन जगत असताना किती माणसे मनापासून जोडली व आपल्या मनात कोणते गैरसमज न करता किती लोकांना, मित्रांना,हितचिंतकांना मोठे केले यावरच त्याचा मोठेपणा अवलंबून असते

मुस्लिम समाजाची या देशात लोकसंख्या १५ टक्क्यांच्या आसपास आहे मात्र शिक्षण क्षेत्रात फक्त चार टक्के आहे मागासलेल्या या समाजात गरिबीच्या परिस्थितीतून आपले नाव मोठे करून चाहतावर्ग निर्माण करणे आजच्या युगात सोपे नाही मात्र पत्रकारिता क्षेत्रा सोबतच चित्रपट क्षेत्र,असो की ग्रंथालय क्षेत्र ज्या क्षेत्रात रफिक भाईंनी पाऊल टाकले ते त्यांनी आपल्या कामाची चिकाटी व जिद्दीने आपले नाव लौकिक ठेवला

रफिक कुरेशी हे नाव मेहकर तालुक्यासाठी काही नवीन नाही “सिर्फ नाम ही काफी है” रफिक कुरेशी यांचे घरची परिस्थिती गरीबीची असताना गेल्या पंचवीस वर्षापासून ते पत्रकारिता क्षेत्रात लोकमत सारख्या एका देशव्यापी मोठ्या वृत्तपत्रात एक निष्ठेने काम करीत होते. रफिकभाईंना लहानपणापासूनच नाती जोडण्याची सवय आहे व त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या निर्भीड पत्रकारिता मुळे पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई तर्फे त्यांना राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार” पुरस्कार, संजीवनी सेवाभावी संस्था डोणगाव तर्फे “संजीवनी दर्पण” पत्रकार पुरस्कार, महेश विद्या मंदिर मेहकर तर्फे “दर्पण पत्रकार” पुरस्कार अल्पसंख्यांक पत्रकार बहुउद्देशीय संस्थातर्फे “सर सय्यद अहमद खान वृत्तरत्न पुरस्कार” अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लहानपणापासूनच सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याने सामाजिक आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या सर्वात मागासलेल्या समाजाचे “शिक्का मोर्तब” सच्चर आयोगाने मुस्लिम समाजावर अभ्यासाअंती केले आहे मात्र ज्ञान, वाचन,ग्रंथ,पुस्तके इत्यादीच्या वेडाने मेहकर शहरातील मुस्लीम बहूल वस्तीत, इमामबाडा चौकात त्यांनी ज्ञानसागर भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सुरु करुन बहुजनांसाठी ज्ञानाचे दालन उभे करुन दिले आहे.

वाचनालयाच्या माध्यमातून सुध्दा सर्व धर्म समभाव जोपासून गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रीय,सांस्कृतिक, सामाजिक,उपक्रम राबविल्याने रफिकभाईंच्या ग्रंथालयाला “आदर्श ग्रंथालय” म्हणून अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहे हे सर्व करीत असतांना राजकीय क्षेत्रात सुध्दा त्यांनी काम केले आहे एनएसयूआयच्या मेहकर शहराध्यक्ष पदापासून तर युवक काँग्रेसचे शहराध्यक्षांसह अनेक पदावर काम करुन नगरपरिषदेची निवडणूक सुद्धा त्यांनी लढविली होती मात्र पत्रकार असल्यामुळे राजकीय नेत्यांकडून योग्य समर्थन,साथ न मिळाल्यामुळे त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातून यशस्वी माघार घेतली.

रफिकभाईंनी

पत्रकारिता क्षेत्राबरोबर चित्रपट क्षेत्रातही काम करण्याची इच्छा असल्याने राजश्री फिल्म प्रस्तुत मराठी चित्रपट “शेतकरी पुत्र” या चित्रपटात त्यांनी शेतकऱ्याची भूमिका साकारली त्या चित्रपटातील “मेला साला लय त्रास देत होता शेतकऱ्यांना” हा त्यांचा डायलॉग सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता त्यानंतर मराठी चित्रपट “चिमण्या” बुलढाणा फिल्म सोसायटीच्या “अशी नको सुनबाई” “हीच बायको पाहिजे” मराठी दिग्गज कलाकार प्रकाश धोत्रे,अभिनेत्री तेजा देवकर,व अभिनेत्री प्राजक्ता माळींसोबत मराठी चित्रपट “काळी माती” अशा नानाविध चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी मिळाली मराठी चित्रपट करीत असताना ऑल इंडिया रिलीज जीत ठाकूर श्री इंटरटेनमेंट प्रस्तुत हिंदी चित्रपट “हक ए सैलानी” व “सुलताने महाराष्ट्र” हिंदी चित्रपट “बीबी खास गर्लफ्रेंड झकास”,सारख्या दिग्गज चित्रपटातही त्यांना चांगल्या भूमिका मिळालेल्या आहेत त्याचसोबत लघु चित्रपट “सावट” “आबासाहेब” “मिशन बुलढाणा” “पासवर्ड” “प्रेम त्याग” “५ सप्टेंबर” इत्यादी लघु चित्रपटात सुद्धा रफिकभाईंनी महत्वाची भूमिका केलेल्या आहेत त्यामुळे चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट भूमिका केल्याबद्दल बुलढाणा फिल्म सोसायटीच्या वतीने “कला गौरव पुरस्कार(२०१४), भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मेहकर तर्फे “कोर्ट” फिल्म चे निर्माता तसेच विद्रोही शाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते कलारत्न पुरस्कार(२०१५), एकता ग्रुप मेहकर तर्फे उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (२०१६) फिल्म ॲक्टर असोसिएशन औरंगाबाद तर्फे नेहा फिल्म अवार्ड (२०१९),महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नागपूर तर्फे शेतकरी संघटनेचे नेते प्रकाशजी पोहरे यांचे हस्ते महाराष्ट्र कला ज्योती गौरव पुरस्कार (२०१९),दिव्य फाउंडेशन महाराष्ट्रतर्फे राष्ट्रीय एकात्मता सेवा रत्न पुरस्कार(२०२०), साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार (२०२२),बुलढाणा फिल्म सोसायटीचा कला गौरव पुरस्कार (२०२२),संजीवनी दर्पण गौरव पुरस्कार (२०२३),कलारत्न समाजभूषण पुरस्कार (२०२३) अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे

कोरोना काळातही त्यांनी कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून केलेल्या जनजागृतीमुळे विविध संघटनांच्या वतीने “कोरोना योद्धा सन्मान” पत्रही देण्यात आलेले आहे समाज कल्याण विभाग मुंबई तर्फे कलाकारांना देण्यात येणारा कलाकार मानधन योजनेसाठी त्यांची राज्यस्तरीय निवड करण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यात एकमेव “अभिनेता” म्हणून जिल्ह्यातील पहिला “कलावंत मानधन”,घेण्याच्या मानही रफिक कुरेशींना मिळालेला आहे.रफीकभाई कुरेशी हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सांस्कृतिक कार्य सेलचे प्रदेश संघटक सचिव, महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव, फिल्म ॲक्टर असोसिएशन चे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष, राज्य ग्रंथालय महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष,ताज-सिने-नाट्य साहित्य कला संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय मेहकर चे अध्यक्ष, कोहिनूर मल्टिपर्पज सोसायटी मेहकर चे अध्यक्ष, लोककलावंत फाऊंडेशन मेहकर चे अध्यक्ष, लोक स्वराज्य फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन ट्रेड युनियन चे तालुकाध्यक्ष, मेहकर शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष,व्हाईस ऑफ मिडीयाचे मेहकर तालुका कार्याध्यक्ष,रामराज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी चे सल्लागार सदस्य, राज्य परिवहन महामंडळ अमरावती विभागाचे माजी सल्लागार सदस्य, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई चे सदस्य, मेहकर पोलीस स्टेशन शांतता कमेटीचे सदस्य अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असूनही अशाप्रकारे लेखणीचा वसा घेतलेला सर्वसामान्य माणूस कधी असामान्य झाला हे कुणालाही उमगले नसून एव्हढे सगळे होऊनही रफिक भाई आजही सर्व कामांच्या व्यापातून दैनिक सकाळ वृत्तपत्रात कार्यरत आहेत आणि विशेष म्हणजे आजही रफिकभाईंचे पाय मात्र जमीनीवरच असल्याने रफिकभाईंनी बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार मंडळींच्या ऋदयात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे असे म्हंटल्यास यात काहीही वावगे होणार ना

ही..

0 9 4 8 6 0
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *