रेशन दुकानदारांनी नागरीकांना चांगली सेवा द्यावी!

Khozmaster
1 Min Read

रेशन दुकानदारांनी नागरीकांना चांगली सेवा द्यावी!  दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीमध्ये सर्वत्र लॉकडाऊन असताना सर्वसामान्य लोकांना अन्नधान्य पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांवर होती व चिखली तालुक्यातल्या रेशन दुकानदारांनी ती अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली. तालुक्यातील रेशन दुकानदारांचे काम उत्तम आहे. त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असून त्यासाठी मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. श्री. छगनजी भुजबळ यांची एकत्रित बैठक यासंदर्भात आयोजित करण्यासाठी मी प्रयत्नरत असल्याची ग्वाही अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग विभागाच्या तालुकास्तरीय दक्षता समितीच्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानी भाषण करताना दिली. या बैठकीस दक्षता समितीचे सदस्य सचिव तहसीलदार सुरेश कव्हळे, शासकीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष राजीव जावळे, संघटनेचे जिल्हा सचिव मोहन जाधव नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्यासह तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार उपस्थित होते.

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *