पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार प्रगत भारताचे स्वप्न साकार.

Khozmaster
1 Min Read

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार प्रगत भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र शासनाने कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रेचा आरंभ केला आहे.

यानिमित्त केंद्रीय मंत्री कामगार मंत्री मा. श्री. भूपेंद्रजी यादव आज व उद्या दोन दिवसांच्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या अंतर्गत आज सिंनगाव जहांगीर ता. देऊळगाव राजा येथे आदरणीय मंत्री महोदयांसह उपास्थित राहून लाभार्थ्यांना लाभ वितरित केला.

यावेळी मा. मंत्री महोदयांनी जनसामान्यांच्या उद्धारासाठी शपथ घेतली. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्री. चैनसुखजी संचेती, श्री. विजयराजे शिंदे माजी आमदार तोतारामजी कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांतजी खेडेकर, डॉ. गणेशरावजी मांन्टे जिल्हाध्यक्ष भाजपा आदी मान्यवर उपस्थित होते.

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *