पालघर :सौरभ कामडी मोहिते महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कोचाळे येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या आयोजन गिरीशवाशी सेवा मंडळ कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी कला वाणिज्य, विज्ञान आणि बी. एम एम. महा विद्यालय खोडाळा जोगलवाडी या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दि.4जानेवारी 10 जानेवारी 2023 दरम्यान कोचाळे गावात आयोजन केले असून सदर शिबिराच्या पहिल्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मनोज कामडी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे महत्त्व सांगितले. त्यांनी त्यावेळी स्वतःचे अनुभव सांगितले. त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या योजना विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सदर शिबिरा दरम्यान योगा,गाव भेट सर्वेक्षण गटचर्चा , श्रमदान स्वच्छता सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध विषयांवर व्याख्यान मालाचे आयोजन केलेले आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . अनिल पाटील उप प्राचार्य,प्रा तुकाराम रोकडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक कडलक, प्रा. नवनाथ शिंगवे, जिल्हा परिषद शाळा कोचाळे मुख्याध्यापक दिनकर फसाळे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.