खोजमास्टर-अविनाश लाड.आज रोजी गारोळे कुटूंबाला मोठ करण्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फार मोठा वाटा आहे
-भास्करराव गारोळे-मेहकर:-जो मनुष्य आपल्या भाकरीतील अर्धी भाकर दुस-याला देतो आणि ज्याला भूक लागली आहे त्याला पोटभर जेवण देऊन त्याची भूक भागवतो तोच माणूस जगातला सर्वात श्रीमंत माणूस असल्याचे मी समजतो असे प्रतिपादन शिवशक्ती ट्रॅक्टर्सच्या वतीने आयोजित पत्रकारांच्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना मेहकर नगर पालिकेचे माजी सभापती भास्करराव गारोळे यांनी उपस्थित पत्रकारांसमोर केले.यावेळी विचारमंचावर पत्रकार सिध्देश्वर पवार,रफिक कुरेशी,भरत सारडा, नारायण पचेरवाल, जयचंद बाठीया, ज्ञानदेव मानवतकर, उबाठाचे उपजिल्हाप्रमुख प्रा आशिष राहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, पत्रकार दत्ता उमाळे, विनोद बोरे,निसार अन्सारी,सुधाकरराव गारोळे आंदिंची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलतांना भास्करराव गारोळे म्हणाले की आपल्या घरी आलेल्या प्रत्येक माणसाला मानसन्मान दिला पाहिजे कुणालाही तुच्छ लेखू नये आणि माणसात दुसऱ्याला मोठेपणा देण्याचा “मोठेपणा” अंगी बाळगला पाहिजेत असे सांगून गारोळे परिवाराच्या उत्कर्षात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खूप मोठा वाटा असल्याचे सांगत गारोळे परिवार कायमस्वरुपी शेतकऱ्यांच्या ऋणातच राहाण्याचा प्रयत्न करेल असे सांगून त्यांनी आपले ऋदयस्पर्शी भाषण संपविले यावर्षी शिवशक्ती ट्रॅक्टर्सच्या वतीने पत्रकारांना “शिवशक्ती जीवन गौरव पुरस्कार” देण्यात आले असून प्रथम वर्षाच्या पुरस्काराचे पत्रकार सिध्देश्वर पवार,भरत सारडा,दत्ता उमाळे हे मानकरी ठरले.यावेळी उपस्थित असलेल पत्रकार जुगराज पठ्ठे,अमर राऊत,अविनाश लाड, सुनिल मोरे,सादिक कुरेशी,संदिप ढोरे, सादिक पठाण, एजाज खान,अनसार शेख,फिरोज शाहा,अलिम शेख, अय्युब पठाण,युनुस बागवान,ज्ञानेश्वर इंगळे,मुन्ना काळे,ॲड सैय्यद मोईन,संतोष जाधव,गजानन देशमुख,तानाजी मानवतकर आंदींना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.यावेळी प्रास्ताविकात बोलतांना शिवशक्ती ट्रॅक्टर्सचे संचालक तथा उबाठाचे शहरप्रमुख किशोर गारोळे यांनी पत्रकार बांधवाची सदैव साथ मिळत असल्याचे सांगून पत्रकार बांधव सातत्याने सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करीत असून भविष्यात सुध्दा सर्व पत्रकारांनी साथ देण्याचे आवाहन केले.तर बहारदार सुत्रसंचालन करतांना पत्रकार प्रदिप जोशी यांनी शिवशक्ती ट्रॅक्टर्स महाराष्ट्र राज्यात व्यवसायात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगून किशोर गारोळेंनी मेहकरसह बुलढाणा जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून दिल्याचे सांगत किशोर गारोळेंना शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन उबाठा युवासेना तालुका प्रमुख ॲड आकाश घोडे यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उबाठाचे ॲड बाळासाहेब गवई, ऋषिकेश जगताप, संदिप गारोळे,पवन पांढरे,स्वप्निल गारोळे, श्याम पाटील निकम, जनार्दन काळे,दशरथ चनखोरे,विलास शिंदे, मारोती जुनघरे यांनी अथक परिश्रम घेतले
Users Today : 16