माहूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांचा मेळावा उत्साहात साजरा

KHOZ MASTER
6 Min Read
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर ‘मराठी पत्रकार परिषदेची कोणतीही राजकीय भूमिका नाही. जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवतील, आह्मी त्या सरकारच्या सोबत आहे. पण जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवणार नाही, आम्ही त्यांच्या विरोधात लढत राहू. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आह्मी लढा सुरूच ठेवू,’ असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळावा शनिवारी, (१३ जानेवारी २०२४) नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड येथे उत्साहात पार पडला. यावेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी आमदार भीमराव केराम, स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर, माहूर नगर पंचायत नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख, नांदेड भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, जिल्हा परिषद नांदेड माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे, माहूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष समरजी त्रिपाठी, मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, टीव्ही असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, मराठी पत्रकार परिषद राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, डिझिटल मीडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभाग विभागीय संघटक प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ गोवर्धन बियाणी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, माहूर तालुका मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी, पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते. देशमुख यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘सरकार कुठल्याही असले तरी पत्रकारांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असाच आहे. सरकारच्या पेन्शन योजनेबाबत नेहमी हे दिसून येते. पत्रकारांना पेन्शन देताना सरकार त्यांच्याकडे बजेट नसल्याचे नेहमीच सांगते. त्यामुळे आता पत्रकारांच्या पेन्शनसाठी सरकारने अर्थसंकल्पातच तरतूद करावी, अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायदा झाला, पण तो कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आलेला नाही. कारण या कायद्याचे नोटिफिकेशनच अद्याप निघाले नाही. ही सरकारने एक प्रकारे पत्रकारांची केलेली फसवणूकच आहे. पत्रकार संरक्षण कायद्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ,’ असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले,’ पत्रकारांनी समाज, सरकार तुमच्यासोबत येईल, ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा पत्रकारांनीच पत्रकारांसाठी आता काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण पत्रकारावर हल्ला झाला तर पत्रकार वगळता कोणी निवेदन सुद्धा देण्यासाठी पुढे येत नाही. हे आपण वारंवार पाहतो. त्यामुळे आता मराठी पत्रकार परिषद पत्रकारांना मदत करता यावी, यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून एक कोटी रुपयांचा फंड उभारण्यासाठी काम करत आहे. या फंडामधून दरवर्षी किमान २५ पत्रकारांना मदत करता आली तरीही ते खूप मोठे काम होईल. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी जिल्हा व तालुका पुरस्कार विजेत्या संघानी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच माहूर तालुका पत्रकार संघ व नांदेड जिल्हा पत्रकार संघाने माहूरगड पत्रकार मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. पाबळे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वाटचालीची माहिती दिली. परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले की,’ मराठी पत्रकार परिषदेला ८४ वर्षांची परंपरा आहे. या परंपरेला कुठेही गालबोट न लावता, व कोणासमोर न झुकता पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचे काम मराठी पत्रकार परिषदेने केले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांची साथ असल्यामुळेच पत्रकारांचे प्रश्न सोडवणे शक्य होत आहे. आगामी काळातही पत्रकारांचे प्रश्न सोडवले जातील,’असेही ते म्हणाले. दरम्यान, लोकशाही या न्यूज चॅनलवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरफराज दोसानी यांनी केले. तर, सूत्रसंचालन श्रद्धा वरणकर व राम तरटे यांनी केले. आभार विजय जोशी यांनी मानले. *’या’ जिल्ह्याचा करण्यात आला पुरस्कार देउन सन्मान*
रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा -उत्तर_नगर आणि दक्षिण_नगर- जिल्ह्यांना विभागून देण्यात आला* दक्षिण नगर जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी स्वीकारला. तर, उत्तर नगर जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाध्यक्ष अमोल वैदय यांनी स्वीकारला. वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार 1) मराठवाडा विभाग : माजलगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा बीड 2) लातूर विभाग : माहूर तालुका पत्रकार संघ, जिल्हा नांदेड 3) नाशिक विभाग : साक्री तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा धुळे 4) पुणे विभाग : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा पुणे 5) अमरावती विभाग : तेल्हारा तालुका पत्रकार संघ, जिल्हा अकोला 6) कोल्हापूर विभाग : बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली 7) नागपूर विभाग : आर्वी तालुका पत्रकार संघ जिल्हा वर्धा 8) कोकण विभाग : अंबरनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा ठाणे. अधिस्वीकृती समितीवर निवड झालेल्यांचा सन्मान मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्य व विभागीय अधिक सिक्युरिटी समितीवर निवड झालेल्या अध्यक्ष व सदस्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. राज्य समितीवर निवड झालेले एस. एम.देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, विनोद जगदाळे, शिवराज काटकर, संजय पितळे यांचा तर विभागीय समिती अध्यक्ष दीपक कैतके, हरिष पाटणे, विजय जोशी यांचा तसेच विभागीय समितीवरील सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विजयसिंह होलम, विनया देशपांडे, अविनाश भांडेकर, चंद्रसेन जाधव यांचा सन्मान करण्यात आला. माहूर येथील ज्येष्ठ पत्रकारांना दिला जीवनगौरव याप्रसंगी समर मुरारीलाल त्रिपाठी, नंदू उर्फ विनायक बापूराव संतान, हाजी कादर दोसानी, गोपाळराव कदम, दत्तराव लालूजी मोहिते यांचा जीवनगौरव पुरस्कार देउन सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात नागपूर वरून महिला राज्य आघाडी प्रमुख, श्रीमती. शोभा जयपूरकर, नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्याध्यक्ष,सुभाष वऱ्हाडे, विभागीय सचिव, संजय देशमुख, किशोर जयपुरकर, पत्रकार, गणेश धानोरकर, अनिल के. बालपांडे, गजेंद्र डोंगरे, वैभव जोगी, शेखर लसुंते तसेच मोनाली लसुंते यांनी सहभाग घेतला होता.
0 9 7 1 9 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *