राष्ट्रीय एकता आंदोलन, आणि समता सैनिक दल, व इतर सामाजिक, कामगार -कर्मचारी संगठनाचे संयुक्त विद्यमाने ईव्हीएम हटाव देश बचाव ! ईव्हीएम हटाव संविधान बचाव !! या मागणी साठी एकदिवसीय धरणे आंदोलन संविधान चौक येथे बुधवार दि 17/1/2024 रोजीदुपारी 1.00 ते 4.00 वाजता अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब, यांचे पुढाकाराने, प्रा रमेश पिशे, प्रदीप गायकवाड, प्रा मधुकर उईके, प्रा राहुल मुन, प्रा. डॉ. एम एस वानखेडे, प्रदीप मुन, मिना भागवतकर, अब्दुल पाशा, सिताराम राठोड यांचे उपस्थित मध्ये आयोजित करण्यात आले. ईव्हीएम हटाव संविधान बचाव व येणारी लोकसभा-विधानसभा निवडणूक फक्त बॅलेट पेपर वरच झाली पाहिजे यासाठी आंदोलन करण्यात आले सर्वच संविधान प्रेमी संघटनानी एकत्र येणे काळाची गरज आहे असल्याचे येणारी लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे ही निवडणूक बॅलेट पेपरवरच व्हावी अशी भावना सर्व उपस्थित संगठना प्रतिनिधीनी व्यक्त केली. आताच्या सरकारने संविधानाचे अवमुल्यन करून ईडी, कोर्ट, चॅनेल, निवडणूक आयोग सह सर्व सरकारी संस्थावर अधिकार प्राप्त केलेला आहे. सर्व मीडिया सुद्धा त्यांनी गुलाम केला आहे. त्यासाठी सत्ता प्राप्त करणे आवश्यक आहे, म्हणून साम-दाम-दंड-भेद वापरुन सत्ता हस्तगत करणे व त्यासाठी सत्तेचा गैर वापर सुरु आहे, अशी भारतीय नागरिकांची खात्री झाली आहे असे मत आपल्या भाषणा मध्ये वेग वेगळ्या वक्त्यांनी दिले. कांग्रेसने ईव्हीएम जन्माला घातले आहे त्यामुळे ते गप्प आहेत व कांग्रेस सह इतर पक्षही गप्प आहेत. महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, शिक्षणाचे बाजरीकरण, मणिपूर हत्याकांड, महिलावर अत्याचार यामुळे लोकशाही धोक्यात आहे तसेच संविधान धोक्यात आहे. ईव्हीएम हटाव – संविधान बचाव ! ईव्हीएम हटाव – लोकशाही बचाव !! ईव्हीएम हटाव – देश बचाव !!! या मागणीसाठी संविधान चौक, नागपूर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये खालील मान्यवर उपस्थित होते. सदर आंदोलनात कास्ट्राईब महासंघ, संविधान परिवार, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडेरेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई,) राष्ट्रीय चर्मकार संघ, बुद्ध विहार समन्वय समिती, ट्रायबल ऑफिसर फोरम, महाराष्ट्र ऑफिसर फोरम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोसअसोसिएशन, डाँ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ असोसिएशन व सर्व सामाजिक, कामगार संघटना सहभागी झाल्यात.
Users Today : 21