भंडारा दि. २५ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींना सत्र 2023-24 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने 31 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. यासाठी www.swadharyojana.com
हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष –
विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा., विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा., शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा., विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रर्वगाचा असावा., विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल., या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनु.जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक, त्याने ज्या राष्ट्रीयकृत, शेड्यूल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल., विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे., विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा., महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात, शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. विद्यार्थी इयत्ता 11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा., इयत्ता 10 व 12 वी मध्ये किमान 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे., 12 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा. (संबंधित अभ्यासक्रम शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी अनुज्ञेय असावा.). विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेमध्ये दिव्यांग (अनु. जाती व नवबौद्ध घटकातील) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील. या योजनेसाठी खास बाब सवलत लागू राहणार नाही.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाकरिता स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
0
8
9
4
6
2
Users Today : 28
Leave a comment