बुलढाणा लोकसभेवर उबाठा सेनेचा उमेदवार निवडून आणणे हीच मां जिजाऊंना खरी आदरांजली
खोजमास्टर-अविनाश लाड.
सिंदखेडराजा :-बुलढाणा जिल्हा हा मातृतीर्थ जिल्हा असून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे माहेरघर असल्याने बुलढाणा लोकसभेतून उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सेनेचा उमेदवार निवडून दिला तर मां जिजाऊंना ही वाहिलेली श्रद्धांजली ठरेल आणि बुलढाणा जिल्हा उबाठा सेनेचे लोकसभा उमेदवार म्हणून जिल्ह्यातील सैनिकांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर हेच लोकसभेचे उमेदवार असल्याचे शिवसेना नेते छगनदादा मेहत्रेंनी सिंदखेडराजा येथील आढावा बैठकीत बोलतांना केले यावेळी ते बैठकीचे अध्यक्ष होते यावेळी ३० जानेवारीला मातृतीर्थ जिल्ह्यातून म्हणजेच सिंदखेडराजा येथील मां जिजाऊंच्या राजवाडा ते शिवतीर्थ मुंबई येथे शिवसेना महिला उपनेत्या सुषमा अंधारे, रश्मीताई ठाकरे यांच्या नेतृत्वात पायी यात्रा काढण्यात येणार असून त्या यात्रेच्या नियोजन साठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या बैठकीस बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा नरुभाऊ खेडेकर, उबाठा जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख,बद्रीभाऊ बोडखे,प्रा आशिष रहाटे,उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे,युवा सेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंगणे, सिंदखेडराजा तालुका प्रमुख महेंद्र पाटील,देऊळगाव राजा तालुका प्रमुख दादाराव खार्डे, मेहकर तालुका प्रमुख माजी सभापती निंबाजी पांडव,किरण दराडे,विलास काळे,परशराम पाटील, संदिप भाकडे, डॉ गोपाल बच्छीरे लोणार, अशोक राजपूत चिखली , अरविंद डहाळके देऊळगाव मही,कांचन गाडेकर यांच्या सह बुलढाणा जिल्ह्यातील उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Users Today : 36