निष्ठावंत कार्यकर्ता हिच माझी ऊर्जा…..!माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील..

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी :-फैजल पठाण, खोज मास्टर ( शिरूर पुणे) निष्ठावंत कार्यकर्ता हिच माझी ऊर्जा…..!माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील.. 26 जानेवारी रोजी शिरूर शहरातील लाटे आळी येथील ऐतिहासिक अशा शाळेच्या भूमिपूजन व शिरूर नगर परिषदेकडे अत्याधुनिक जेटिंग मशीन हस्तांतरण तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेद्वारे नवीन व्हाट्सअप ॲप चे उद्घाटन प्रसंगी शिरूर येथे आले असता, पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, माझ्या विकास कामाची पावती मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी दिलेली आहे. विकास कामे करत असताना निष्ठावंत कार्यकर्ता हीच माझी उर्जा आहे. त्यापैकी मयूर थोरात अनिल काशीद, संतोष वर्पे, रामभाऊ सासवडे आदी कार्यकर्त्यांचा आवर्जून  उल्लेख ही केला. मी कधीही निष्क्रिय खासदार नव्हतो असा अप्रत्यक्षपणे टोला ही खा. अमोल कोल्हे यांना लावला, मराठा आरक्षण या विषयी बोलताना म्हणाले मराठा आरक्षण हे मिळाले पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. अशा अनेक प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

0 9 4 6 7 4
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *