शहागंज येथे पोलिसांच्या सतकॅतेमुळे धाडसी चोरीचा प्रयत्न फसला

Khozmaster
3 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
छत्रपती संभाजीनगर येथील सिटी चौक पोलीसांनी रात्रगस्ती दरम्यान मध्यरात्री सराईत गुन्हेगाराला शहागंज, चेलीपुरा भागात चोरी, घरफोडी करण्याचे उद्देशाने अंधारात स्वतःचे अस्थित्व लपवत असतांना पोलीसांच्या सतर्कते मुळे मिळून आल्याने होणारी घरफोडी, चोरी टलळी.मा. मनोज लोहीया साहेब, पोलीस आयक्त, मा. नितीन बगाटे साहेब, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ । व मा. संपत शिदे सहाय्यक पोलीस आयुक्त सो. शहर विभाग, श्रीमती निर्मला परदेशी, पोलीन निरीक्षक, पो.स्टे. सिटी चौक यांचे मार्गदर्शना प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे, मंगेश पंडीत, चालक पवार, बनकर, विनोद पवार, भिसे, योगेश गाडेकर असे दिनांक 28/01/2024 रोजी चे 21.00 वाजे ते दि. 29/01/2024 रोजीचे 09.00 वाजे पर्यंत पोलीस स्टेशन सिटीचौक येथे कर्तव्यावर असतांना दि. 28/01/2024 रोजी 23.00 वा. डी.ओ. अधिकारी पोउपनि, मुंडे, चालक पवार असे शासकीय वाहन पिटर मोबाईल क्र. एम.एच. 20/जी.के. 4937 ने रात्र गस्त कामी पो.स्टे. हद्दीत रवाना होउन रात्र गस्त करत असतांना दि. 29/01/2024 रोजी 02.35 वाजता शहागंज ते चेलीपुरा चौक, महाविर किराणा, हनुमान मंदिर जवळ, छत्रपती संभाजीनगर येथे पेट्रोलींग करीत असतांना अंधाराचा फायदा घेवुन एक इसम हा शटर जवळ अंधारात आपले अस्तीत्व लपवतांना आम्हाला दिसल्याने आम्ही आमचे शासकीय वाहन थांबवुन सदर इमास पाहिले असता तो पोलीसांना पाहुन लपुन बसला तो मिळून न आल्याने त्याचा आजुबाजुला महाविर किराणाचे वॉचमन नामे संदिप बाबासाहेब आगळे यांचे सह शोध घेतला असता तो अंधाराचा फायदा घेऊन हनुमान मंदिर चे पाठिमागे असलेल्या पिंपळाच्या झाडाचे बुंद्याजवळ जाऊन लपलेला दिसुन आला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता अडखळत अडखळत त्याने त्याचे नाव शेख मोहसीन शेख ख्वाजा, वय 26 वर्षे, व्यावसाय- मजुरी, रा. घर क्र.8-10-27-4 AMC, शाळेमागे युनुस कॉलनी, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर, ह.मु. अनास मस्जिदजवळ, वॉशिंग सेंटर, रहेमानिया कॉलनी, किराडपुरा येथे भाड्याने, छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमा बाबत पो.स्टे. अभिलेख पाहिला असता तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असुन त्याचे नावे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यास आम्ही शहागंज ते चेलीपुरा चौक, महाविर किराणा, हनुमान मंदिर जवळ, छत्रपती संभाजीनगर येथे अंधारात थांबण्याबाबत व हनुमान मंदिराचे पाठीमागे असलेल्या पिंपळाच्या झाडाचे बुंद्याजवळ लपुन बसण्याचे कारण विचारले असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे देवुन समाधानकारक उत्तरे दिली नाही.
नमुद इसम हा सुर्यास्त ते सुर्योदयाचे दरम्यान कोणतातरी घरफोडी, चोरी सारखा मालाविरुध्द गुन्हा करण्याचे उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवुन संशयस्पदरित्या अंधारामध्ये लपत असतांना मिळुन आला आहे, करीता त्याचे विरुध्द कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निर्मला परदेशी, पोलीस उप निरीक्षक प्रशांत मुंडे, मंगेश पंडीत पोअ/2684, चालक पोअ/ 2196 पवार, पोअ/बनकर, विनोद पवार, भिसे, योगेश गाडेकर यांनी केली आहे.
0 9 3 8 1 3
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *