छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीचे लातूर राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप बाबा खांडापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पुढील निवड करण्यात आली. *निर्मला ताई बुल्हे लोणारी नासीक जिल्हा कार्याध्यक्षा यांनी शिरजगाव लौकी या गावातील अवैध दारु बंद व्हावी म्हणून ग्रामपंचायत च्या बैठकीत 150 महीलांना घेऊन ठिय्या मांडला,पोलीसा कडे तक्रार केली, पोलीस खात्याने या तक्रारीची दखल घेऊन शिरजगाव लौकी, अन्य गावातील अवैध दारुचे शेड बुलडोझर लावुन उध्वस्त केले,बर्याच अवैध दारु विक्रेत्या विरोधात गुन्हे दाखल केले,हे “येवला तालुक्या “साठी आणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती साठी भूषणावह आहे,आणी म्हणून गेल्या 7 वर्षा पासुन संघटनेचे क्रियाशील कार्य करणार्या निर्मला ताई बुल्हे लोणारी यांची ॲड. राणीताई स्वामी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या महाराष्ट्र प्रदेश महीला विभाग यांनी निर्मला ताई यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदी निवड केली आहे*
*निर्मला ताई बुल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा,प्रदेश अध्यक्ष पंडित राव तिडके, प्रदेश अध्यक्ष निवड समिती अनिल दादा देसले, प्रदेश अध्यक्ष माजी सैनिक विभाग उल्हास दादा पाटील,शिवा काळे प्रदेश अध्यक्ष सोशल मिडीया यांच्या वतीने निर्मला ताईचे अभिनंदन*अशी माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष यांनी मराठवाडाचे सरचिटणीस गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना दिली.