सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८४ प्रकरणांची नोंद
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर, ता.३०:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवार (ता.३०) रोजी उपद्रव शोध पथकाने ८४ प्रकरणांची नोंद करून ४१,५०० रुपयाचा दंड वसूल केला.
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ३८ प्रकरणांची नोंद करून १५२०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०५ प्रकरणांची नोंद करून ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आली.
वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०७ प्रकरणांची नोंद करून १३००० रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास १९ प्रकरणांची नोंद करून रु ३८०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०४ प्रकरणांची नोंद करून रु ४००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
*प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यां ०५ प्रकरणाची नोंद*
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०५ प्रकरणांची नोंद करून २५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. यात प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या २ प्रकरणातून १० हजार रुपये वसूल करण्यात आले. शोध पथकाने रस्त्यालगत बांधकाम साहित्य टाकणाऱ्या मे. माँ वैष्णवी इन्फ्रा यांच्याकडून रुपये ०५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. तसेच रस्त्यालगत लँबचा कचरा जाळल्याप्रकरणी मे. सीमा टेस्टिंग लँबोरटी यांच्याकडून रुपये ०५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.