गट तट ..
गटांचे राज कारण
पक्षात बांधले तट
करत राहती उद्रेक
अस्वस्थस्वस्थ गट
अभेद्य रे किल्यांना
कित्येक जागी फट
फटी होई भगदाडी
दरडी पडे सटासट
गट गटात धुसफूस
आपसांत झटापट
धुरात होई धुसमूस
आग वाढते झटपट
सोगट्यांच्या वादात
शांत बुध्दीबळ पट
आपल्याच राजाला
कसे करता चितपट
कुरघोडी करी घोडी
एक दुस-या लटपट
मीच कसे श्रेष्ठ असे
करत राही खटपट
अधून मधून पक्षात
करावा खांदे पालट
तब्येतीत ठेवा पक्षा
जरुरीचा हवापालट
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
Users Today : 1