वाशिम खोजमास्टर प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर; 31जानेवारी 2024
मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे महिला सक्षमीकरण समिती व आदित्य बिर्ला एज्युकेशन
ट्रस्ट मुंबईच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन प्रशिक्षणाबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस वी रुक्के ह्या होत्या आणि प्रमुख अतिथी म्हणून डॉ.पी. एस पाथरकर मॅडम या उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी एस पाथरकर यांनी केले त्यांनी विद्यार्थीनी ना मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी शारीरिक स्वच्छता आणि आरोग्य व आहार यासंबंधी विस्तृत माहिती दिली तसेच आरोग्य आणि आहार या दोन्ही बाबी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. एस. वी रुक्के मॅडम यांनी सुद्धा मासिक पाळीच्या काळात होत असणाऱ्या शारीरिक समस्या आणि त्यावर घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली मासिक पाळीच्या संदर्भात अनेक रूढी आणि प्रथा आहेत त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत असतो समाजात स्त्रियांना या संदर्भात मोकळेपणाने बोलता येत नाही त्यामुळे त्यांची अडचण होते.चांगल्या दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन वापरून अनेक आजारापासून त्यांचे संरक्षण करता येते या प्रशिक्षणाचा मूळ उद्देश महिलांच्या आरोग्याच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे होते या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन चे वितरण करण्यात आले असून भरपूर विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला या कार्यकर्माचे सूत्रसंचालन कु. मुस्कान भवानी वाले हीने केले तर आभार प्रदर्शन कु. विजया खंडारे यांनी केले.
Users Today : 22