पोलिसांनी अडवल्यामुळे झाला अपघात

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वेरूळ – सोलापूर – धुळे चौफुलीवर टेम्पो उलटला
छत्रपती संभाजीनगर,खुलताबाद : वेरुळ येथे सोलापूर धुळे चौफुली वरून वेरूळ कडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच अपघात घडत आहे.व नेमके त्याच ठिकाणी पोलिसांचा ताफा तपासणीच्या नावाखालो उभा असतो आणि वेरूळ या ठिकाणी आलेले पर्यटकांच्या गाड्या नेमक्या तिथूनच जातात त्यामुळे परराज्यातील गाड्यांची येथील पोलीस तपासणीच्या नावाखाली गाड्या थांबवतात. येथून जाणाऱ्या गाड्यांना थांबण्यासाठी केल्यामुळे या चौफुल्यावर मोठा अपघात झाला.व ही चित्र सततची आहे हे विशेष. पोलिसांनी अचानक चौफुलीवर हात दिल्यामुळे ड्रायव्हर गडबडून जातात आणि गाडीचा ताचा सुटून आज अपघात घडला. त्यामुळे यामध्ये पिकप चालक आणि भडगांव, संभाजीनगरकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर मधील प्रवासी काही जखमी झाले. सोमवारी दि.२९ सकाळी दहा वाजेच्या सुमारासशेतकऱ्याचा बोडखा येथून धान्य घेऊन जाणारा पिकप बोडखा हुन लासुर कडे जात असताना वेरूळ येथे अपघात झाला.चौफुलीवर अगोदर टेम्पो ट्रॅव्हल पोलिसांनी थांबवले होते टेम्पो ट्रॅव्हल प्रवासी पोलिसांना भेटून परत त्यांच्या गाडीकडे जात असताना अचानक समोरून पोलिसांना धान्याची पिकप भरून येताना दिसली त्याला अचानक हात दिल्यामुळे पिकप चा ड्रायव्हर गडबडला आणि टेम्पो ट्रॅव्हलर जाऊन आदळला आणि पुढे रोडावर पलटी झाला. धान्य घेऊन जाणारे पिकपमधील शेतकरी आणि ड्रायव्हर हे जखमी झाले. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी संभाजीनगर ला पाठवण्यात आले. गाडीतील प्रवाशांचे असे म्हणणे इवले की येथे आम्हाला पोलिसांनी अचानक थांबवल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले. नव्यानेच रुजु झालेले पोनि धनंजय फराटे याकडे लक्ष घालून येथे पर्यटक तथा वहानधारकांना होणारा त्रास थांबवतील का? असा सवाल पर्यटक तथा वहानधारक नागरिक उपस्थित करत आहे.
0 9 3 8 1 3
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *