गजानन माळकर पाटील जालना जिल्हा खोजमास्टर प्रतिनिधी मंठा.
मंठा – तालुक्यातील पांगरी खुर्द येथे उत्साहपूर्ण वातावरणात शिवसेना शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. शाखा उद्घानाप्रसंगी गावातील शेकडो पुरुष, तरूण मंडळी, वयोवृद्ध मंडळी, महीला उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते अर्जुन खोतकर जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल व उदयसिंह बोराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेकांनी शिवसेना पक्ष बळकट करण्याचा निर्णय घेतला. उदयसिंह बोराडे यांच्या तरूण नेतृत्वाखाली अनेक तरुणांना पक्षात काम करण्याची संधी मिळाली याबद्दल शाखाप्रमुख शुभम शेंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आभार मानले. शिंदे सरकारच्या विविध योजना व विकासकामांची सखोल माहिती जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी यावेळी दिली.पक्षाने दिलेल्या जबाबदारीचा समाजासाठी सदुपयोग करावा व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यानी प्रयत्न करावा असे प्रतिपादन उदयसिंह बोराडे यांनी केले.
यावेळी शाखाप्रमुख म्हणून शुभम शेंडगे तर उपशाखाप्रमुख आसाराम शेंडगे, सचिव लखन काळे, सल्लागार माऊली काळे कोषाध्यक्ष अमोल काळे या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश गणगे, उपतालुकाप्रमुख गजानन कापसे, उपतालुकाप्रमुख रामराव वरकड, दलीत आघाडी अध्यक्ष दिलीपराव हिवाळे, उपशहरप्रमुख दत्ता बोराडे, युवासेना उपतालुकाप्रमुख लिंबाजी बोराडे,युवासेना उपतालुकाप्रमुख महादेव उकंडे, सर्कल प्रमुख माऊली वायाळ,उपशहरप्रमुख रफिक खान, अल्पसंख्यांक शहर प्रमुख मोबिन खाटीक या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Users Today : 12