Saturday, February 24, 2024

बुलढाणा गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन.

बुलढाणा – देऊळघाट
ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार केल्याचे उघड.
निलंबन आदेशाची प्रत देत नसल्याचा आरोप बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायत मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार उपसरपंच आरिफ खान यांच्यासह इतरांनी बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली असता त्यात आरोपात तथ्य आढळल्याने देऊळघाट ग्रामविकास अधिकाऱ्याला एका आदेशान्वय निलंबित केल्याचे समजते परंतु सदर निलंबन आदेशाची परत तक्रारकर्त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे उपसरपंच आरिफ खान,माजी पं. स. उपसभापती मुश्ताक अहेमद,माजी सरपंच गजनफरउल्लाह खान,  विकास देशमुख,सखाराम पाटील,माजी तंटामुक्ती अध्यक्ष जुनेद खान,अनिस खान, शेख आरिफ यांच्यासह इतरांनी आज 31 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता बुलढाणा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. निलंबन आदेशाची परत देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती.ग्रामविकास अधिकारी राजरत्न जाधव यांना निलंबित केल्याचा लेखी पत्र अखेर आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर भेटूया आंदोलन स्थगित करण्यात आले.
- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang