जिल्हाध्यक्ष माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा , जिल्हा कार्याध्यक्ष, माननीय प्रसेनजित दादा पाटील , जिल्हा कार्याध्यक्ष नरेश भाऊ शेळके यांच्या आदेशानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माननीय रोहित दादा पवार यांच्या वर, ऐन निवडणुकीच्या तोंडावर या गद्दार मींदे खोके सरकारने फक्त विरोधी पक्षाला अडचणीत कसे आणता येईल या उद्देशाने या ईडी च्या नोटीसा आणि चौकशी सुरू केली आहे.याचाच आपल्याला मेहकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध नोंदवून, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी तहसीलदार मेहकर यांना निवेदन देण्यासाठी, तालुक्यातील सर्वच सेलचे अध्यक्ष युवक आघाडीचे सर्व, तसेच सर्व नेते मंडळींनी दिनांक 1फेब्रुवारीला ठीक 12 वाजता हादिमियां बाप्पू कॉम्प्लेक्स वर हजर राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेहकर तालुका व मेहकर शहराच्या वतीने केले आहे.तरीही सर्वांनी वेळेवर न चुकता हजर रहावे.जय राष्ट्रवादी.
सदैव तत्पर जनतेसाठी………..