Saturday, February 24, 2024

मुळा एज्युकेशन संस्थेचा ४५ वा वर्धापन दिन:- विद्यार्थ्यांचा सन्मान

नेवासा प्रतिनिधी:- (लखन वाल्हेकर)  डॉ.निलेश साबळेची सोनई गावामध्ये हवा

मुळा एज्युकेशन संस्थेचा ४५ वा वर्धापन दिन:- विद्यार्थ्यांचा सन्मान
शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर असलेले “मुळा एज्युकेशन सोसायटीचा” ४५ वा स्थापना दिवस नुकताच ज्येष्ठ साहित्यीक मा.खा.यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या प्रेरणेतून, मा.आमदार.शंकररावजी गडाख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे “चला हवा येवू द्या” फेम व सिनेस्टार
मा.डॉ.निलेशजी साबळे, संस्थेचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख पा.डॉ.निवेदिता गडाख, नेहलदीदी गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अहमदनगर जिल्हा व जिल्ह्या बाहेरही प्रसिद्ध असलेल्या मुळा एज्युकेशन संस्थेच्या उभारणी पासून ते आजपर्यंत विविध क्षेत्राच्या माध्यमातून संस्थेच्या वाढीसाठी व संस्थेच्या नावलौकिकामध्ये ज्यांनी भर घातली आहे त्यांचा सन्मान तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी कला व क्रीडा क्षेत्रातील हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्या करिता यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आयोजित करण्यात आलेल्या यशोरंग क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या “यशोरंग” लोगोचा अनावरण समारंभ फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये अतिशय आनंदात व उत्साहात संपन्न झाला व नंतर “यशोरंग कला व क्रीडा” महोत्सवामध्ये संस्थेच्या विविध शाळा व कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला व नृत्याविष्कार सादर करत सर्वांची मने जिंकली.
यावेळी विविध क्षेत्रातील सन्मानिय मान्यवर, संस्थेचे विश्वस्त, सचिव, सहसचिव सर्व अधिकारी वृंद, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang