केंद्र सरकार कडून विरोधी पक्षातील नेत्यांची हेळसांड थांबवा

Khozmaster
1 Min Read
 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोयगाव तहशिला दिले निवेदन उपसंपादक
गोकुळसिंग राजपूत सोयगाव
सोयगाव; केंद्र सरकार कडून विरोधी पक्षातील नेत्यांची हेळसांड थांबविणे बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष इंद्रसिंह सोळंके व पदाधिकारी अधिकारी यांनी दि.१/२/२४ रोजी सोयगाव तहशिल कार्यालयात लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र व राज्य सरकार विरोधी पक्षातील नेत्यांची काही कारण नसताना इडी व सिबीआय यांच्या मार्फत चौकशी करतात तरी या चौकशीला आळा बसून नि पक्षापाती करण्यात याव्यात व या प्रमुख चौकशी समितीच्या गैर वापर करणे चुकीचे आहे ते थांबवावे असे लेखी निवेदन सोयगाव तहशिलचे तहशिलदार मोहनलाल हरणे यांच्या कडे व मा.जिल्हाअधिकारी छत्रपती संभाजीनगर,मा.उपविभागिय अधिकारी सिल्लोड यांच्या कडे शुद्धा लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी केली आहे.याप्रसंगी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉ इंद्रसिंह सोळंके तालुका अध्यक्ष,रविंद्र काळे,दिपक देशमुख,करीम देशमुख, कृष्णा पाटील,अजय नरेपगाट,दत्तू निकम, रोहिदास जाधव,शेषमल गोंडू व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *