छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय व छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळदबारा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून एक दिवसीय कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरासाठी फरदापुर पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पिंक पथक प्रमुख पोलीस स्टेशन सिल्लोड उपविभाग पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळोसे व फरदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे हे प्रमुख मार्गदर्शक होते सोशल मीडिया वापर व रॅगिंग कायदा psi गजानन कौळासे सांगितले की विद्यार्थ्यांनी शालेय जीवन जगत असताना कोणत्याही विद्यार्थ्याला व विद्यार्थिनीला आपल्या बोलण्यातून किंवा कृतीतून कोणत्याही प्रकारचा मानसिक व शारीरिक त्रास होणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायला पाहिजेत तसेच दैनंदिन जीवनात करत असताना मोबाईलचा सर्रास वापर हा जीवन आवश्यक न होता जीवनाला घातक होत आहे परिणामी पालकांना आपले मुलं गमवावे लागत आहेत अशा बातम्या आपण दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचत असतो तेव्हा प्रत्येकाने मोबाईलचा वापर केवळ आवश्यक तिथं व योग्य त्या कामासाठीच करावा कारण आपण केलेली मोबाईल वरती कोणतीही कृती ही तुम्ही डिलीट करू शकता परंतु सायबर कॅफेला ही सर्व माहिती आयुष्यभर सेवा असते तेव्हा आपण घेत असलेली कोणती पोस्ट किंवा इतर माहिती समाज विघातक आहे किंवा उपयोगी तरच ती फॉरवर्ड व शेअर करावी जेणेकरून इतरांना त्याचा कोणताही सामाजिक अथवा मानसिक त्रास होणार नाही या गोष्टीवर प्रामुख्याने प्रकाश टाकला त्यानंतर psi सुग्रीव चाटे यांनी बालविवाह बद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले भारतीय राज्यघटनेनुसार मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्षे असेल तरच त्यांचा कायद्यानुसार विवाह योग्य ठरतो तेव्हा या आतील मुला मुलींची विवाह हे बेकायदेशीर असून या विवाह साठी जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांना दोशी ठरवून त्यांच्यावर योग्य ती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात परंतु बालविवाह होण्यासाठी खऱ्या अर्थाने कारणीभूत असते ते आपले वर्तन आपण शालेय अवस्थेत असताना शाळेत समाजात व परिवारात कशाप्रकारे वागतो यावरून परिवार व समाज आपल्याला विवाह करण्याचा सल्ला देतो आपल्या कृतीमुळे आपल्या वयाचाही विचार न करता आपले कुटुंब आपले लग्न लावून देतात खऱ्या अर्थाने याला कारणीभूत आपण स्वतः आहोत तेव्हा आयुष्यात कोणतेही पाऊल उचलताना परिवाराचा समाजाचा व स्वतःच्या जीवनाचा विचार करावा तरच आयुष्यात योग्य व योग्य पाऊल उचलावे तसेच दैनंदिन जीव जगत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली मैत्री शक्यतो टाळावी अनोळखी व्यक्ती सोबत कोणत्याही प्रकारचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करू नये जेणेकरून आपल्याला स्वतःच्या कुटुंबाची व स्वतःची बदनामी टाळता येईल याचे प्रत्येकाने पथ्य पाळावे त्यामुळे बालविवाह आपल्या परिसरात व आपल्या आजूबाजूला कुठे होत असल्यास पिंक पथक किंवा दामिनी पथक किंवा आपल्या जवळ पाचच्या पोलीस स्टेशनला संपर्क करून ही माहिती द्यावी असे सखोल मार्गदर्शन केले. असे सविस्तर मार्गदर्शन नव्यानेच रुजू झालेले सपोनि प्रफुल्ल साबळे फर्दापूर पोलिस स्टेशन यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते यांनी संस्थेच्या व शाळेच्या वतीने प्रफुल साबळे साहेब यांना शाल श्रीफळ व पुस्तक देऊन त्यांचा जाहीर सत्कार तसेच सोयगाव तालुक्यात आपली नवीन नेमणूक झाली त्याबद्दल अभिनंदन व आभार व्यक्त केले त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार समारंभाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला प्रा जीवन कोलते पा यांनी संस्थेच्या वतीने प्रास्ताविक पर भाषण करून संस्थेचे व शाळेची सर्व माहिती मान्यवरांना सांगितली सूत्रसंचालन करून आलेल्या सर्वांना सोशल मीडियाचा वापर व गैरवापर तसेच महिला सबलीकरण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन सुद्धा केले आलेल्या सर्व पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व प्रमुख पाहुण्यांचे व पत्रकार बंधूं उपसंपादक गोकुळसिंग राजपूत, रहीम खान पठाण यांचे स्वागत केले. व संस्थेतील सर्व पदाधिकारी सर्व विद्यार्थी व गावातील पालक मान्यवर उपस्थित होते शाळेतील शिक्षकसर्व शिक्षक सर्व विद्यार्थी व शिक्षक विकास पाटील, विजय सिंग राजपूत, भास्कर ससाणे, संजय जोशी, भास्कर खमाट, मुकुंद व्यवहारे, सुदाम राठोड, ज्ञानेश्वर राठोड, पोपटराव सोनवणे, भूषण देसले,प्रा. जीवन कोलते पाटील,शाम जाधव, अजबराव चव्हाण, बाबासाहेब कोलते, राहुल बडक, गणेश मोहने ,गणेश सत्रे, जयराम घोती,सतीश खवले, पंजाबराव शेळके, योगेश थोटे, सतीश गावंडे, जयराम घोती मनोहर पडोळ, संजय अमृतकर,शिवाजी सत्रे इत्यादी प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते तर सर्व विद्यार्थी व पालक तो पत्रकार बंधू गोकुळ सिंग राजपूत, रहीम पठाण, सुनील चोरमले, जब्बार एस तडवी सर्व पालकांचे शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आभार प्रा प्रविण सरकटे पा.यांनी मानले.
Users Today : 39