सावळदबारा येथे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना कामांना मुहूर्त मिळेना

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात महाराष्ट्र शासनाच्या अभिनव योजना मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना मनरेगा कामांना सोयगाव तालुक्यात मुहूर्त मिळत नसल्याने चित्र दिसत आहे.गत दिडदोन वर्षांपासून कामे रखडून असुण निधी उपलब्ध असताना चालढकल मुळे कामे रखडून असल्याचे चित्र आहे.पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना राबविण्याचा शासन निर्णय सन२०१८केलेले आहे. यामधे रस्त्यांची वर्गवारी आहे त्यात एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारे रस्ते, शेतावर जाण्याचा गाडी मार्ग या प्रकारच्या वर्गवारी मोडणारे सावळदबारा ते कालंकादेवी रस्ता हा गाडी मार्ग  वस्ती आदि व अन्य तालुक्यातील, परिसरात रस्ते या योजनेत मंजूर असताना व निधी उपलब्ध असताना तथा तालुका पंचायत समिती आम सभेत गाजलेला हा प्रश्न मार्गी लागत नाही. यात निव्वळ चालढकल सुरु आहे.ग्रामपंचायत ते वरिष्ठा पर्यंत याकामाचा पाठपुरावा करुनही मार्गी नसल्याने निधी असताना नागरिकांना नहक्क रस्ते विना त्रास सहन करावे लागत आहे. वरिष्ठांनी या योजनेची दखल घेऊन तातडीने काम मार्गी लावावे असी मागणी महिला शिवसेना आघाडीच्या तालुका अध्यक्ष अलकाबाई राजपूत व शेतकरी नागरिकांतून होत आहे.
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *