छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जळकी बाजार:– अवघ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिल्लोड तालुक्यातल भारतातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे तिसरे मंदिर असलेल्या शिवतीर्थ जळकीबाजार येथील शिवजयंती उत्सव समिती कार्यकारणी जाहीर झाली आहे..दर वर्षी अनेक समाजउपयोगी उपक्रम राबवित आदर्श पद्धतीने शिव जन्मोत्सव साजरा होत असतो.जिल्हा भारत आदर्श शिवजयंती साजरी करण्याचा संदेश घेवून अनेक नवनवीन उपक्रम राबवून साजरे करीत असतात…श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शिवतीर्थ जळकी बाजार येथे मंदिर समितीची वार्षिक सभा स्मपंन झाली.या सभेत सर्वांच्या सहमतीने शिवजयंती 2024 उत्सव समिती कार्यकारणी करण्यात आली.या मधे अध्यक्षपदी श्री निवृत्ती दांडगे,उपाध्यक्षपदी श्री ऋषिकेश दांडगे, सचिवपदी श्री किरण जाधव,सह सचिवपदी हनुमंता दांडगे,विशेष सल्लागारपदी श्री रोहिदास दांडगे,तर,कोषाअध्यक्षपदी रवींद्र सोनवणे,यांची निवड करण्यात आली असून,या ही वर्षी मोठ्या उत्साहात शिव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.या वेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी,सभासद, यांच्या सह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती.
Users Today : 39