छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
छत्रपती संभाजीनगर; लातूर जिल्ह्यातील हिंदू दलित खाटीक समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशीची कठोर शिक्षा देऊन पीडित मुलीला व कुटुंबीयास न्याय देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना 30 जानेवारी रोजी हिंदू दलित खाटीक समाज विकास मंडळ व सतुर सेना तसेच जिल्ह्यातील समाज बांधवांच्या वतीने अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटना छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने दि.१/२/२४ रोजी आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले. सहा वर्षीय मुलीवर घरा शेजारी राहणाऱ्या २२ वर्षीय विवाहित इसमाने अत्याचार केला. तसेच तू घरी कोणाला याबाबत सांगितले तर मी तुला मारून टाकेल अशी पीडित मुलीला आरोपी धमकी देत होता. तिचे वडील मरण पावलेले आहेत तिच्या कुटुंबाची जबाबदारी आईवर आहे. मोलमजुरी करून संसाराचा गाडा झोपडीत राहून चालविते.शासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष देऊन फास्टट्रॅक न्यायालयाद्वारे खटला चालवून नराधमास फाशीची शिक्षा देऊन पीडित मुलीला व तिच्या परिवाराला योग्य न्याय व आर्थिक मदत मिळून देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली.निवेदन देताना वलांडी जिल्हा लातूर येथील हिंदु खाटिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निवेदन देण्यात आले यावेळी , छगनराव पारडे , प्रल्हादराव माकोडे, डॉ.संजय रत्नपारखे, डॉ. रावळकर, अशोक कंटाळे, नारायणराव कल्याणकर, अरुणराव कंटाळे, रामभाऊजी माहुरे, तुळशीराम कल्याणकर, गणेश रावळकर (रांजणगावकर), शांताराम खराटे सावळदबारा, सुनील माकोडे,संतोषराव हिवराळे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.