माजी आमदार संजय रायमुलकर यांनी नागेश वाडी येथील डायरिया रुग्णांची घेतली भेट परिस्थितीची केली पाहणी

KHOZ MASTER
2 Min Read

मेहकर
मेहकर तालुक्यातील नागेश वाडी येथे दूषित पाण्यामुळे ५० पेक्षा जास्त रुग्णांना डायरियाची लागण झाली. आज प्रत्यक्ष गावात भेट देऊन माजी आमदार संजय रायमुलकर यांनी रुग्णांच्या परिस्थितीची पाहणी केली. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. सदर गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत संबंधित विभागाला त्यांनी सांगितले.
सदर गावामध्ये विहिरीतील पाणी दूषित झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर डायरियाची लागण झाली. पहिल्याच दिवशी संजय रायमुलकर यांनी आरोग्य विभागाच्या विविध अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सूचना देऊन रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सांगितले. आज प्रत्यक्ष नागेश वाडी येथे भेट देऊन रायमुलकर यांनी आरोग्य कॅम्पमध्ये रुग्णांना चांगला उपचार देण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. पाणी दूषित झालेल्या विहिरीची पाहणी करून सदर गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत सरपंच यांना सांगितले. जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात असलेले बहुतेक रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती डॉ. अनिकेत राठोड यांनी दिली. जानेफळ येथे ३० रुग्ण उपचारासाठी पाठविले होते, त्यापैकी १८ जण बरे होऊन परतले आहेत, असेही डॉ. राठोड यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे ऍडमिट असलेल्या १९ रुग्णांपैकी १३ जण बरे होऊन परत आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सरपंच गजानन चनेवार यांनी सांगितले की गावामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा विशेष वाहनाद्वारे सुरू करण्यात आला आहे. सदर गावात आरो प्लांट उभारणीचे काम सुरू केले आहे.
यावेळी शिवसेनेचे दिलीपबापू देशमुख, दिलीप पाटील, प्रल्हाद आप्पा चुकेवार, सतीश जैन, सरपंच राजकुमार पाखरे, गजानन चनेवार, सुभाष नवले त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे डॉ. अनिकेत राठोड, डॉ. प्रीती गवई, आरोग्य पर्यवेक्षक विठ्ठल घुले, एस बी डोके, यशस्वी चौधरी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून सदर गावात दोन शाळेच्या खोल्यांचे बांधकाम मंजूर आहे .त्या जागेची पाहणीही त्यांनी केली. नवीन कुणी डायरियाचे रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात यावे. यात कुठलाही हलगर्जीपणा होऊ नये असेही संजय रायमुलकर यांनी सांगितले.

0 9 7 3 3 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *